Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: नोकरी दो, नशा नहीं! बेरोजगारी आणि अंमली पदार्थांविरुद्ध युवक काँग्रेस आक्रमक

Goa Politics: तरुणांमधील बेरोजगारी आणि अंमली पदार्थांचे व्यसन दूर करण्यासाठी गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ‘नोकरी दो, नशा नाही' या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Youth Congress Campaign

मडगाव: तरुणांमधील बेरोजगारी आणि अंमली पदार्थांचे व्यसन दूर करण्यासाठी गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ‘नोकरी दो, नशा नाही' या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष रिनाल्डो रुझारियो, युवा नेत्या देवसुरभी यदुवंशी, उमर तांबुली आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान रिनाल्डो रुझारिओ यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन पूर्ण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका केली.

भाजप सरकार नोकऱ्या विकण्यात गुंतले आहे, हे लज्जास्पद आहे. यामुळे पात्र उमेदवारांना नोकरी मिळण्यापासून वंचित राहावे लागते. आपण एकजूट होउन आणि याविरोधात आवाज उठवून हे प्रकार थांबवण्याची गरज आहे, असे रिनाल्डो रुझारिओ म्हणाले.

गोव्यातील व्यवसाय आणि इतर छोटे व्यवसाय सरकारने उद्ध्वस्त केले आहेत. ते सर्व बाबतीत अपयशी ठरले असून रोजगार उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे असे ते म्हणाले. देवसुरभी यदुवंशी यांनीही भाजप सरकार नोकऱ्या देण्यात अपयशी ठरल्याची टीका केली. ‘‘गोव्याच्या कानाकोपऱ्यात अंमली पदार्थ पोहोचले असून तरुणांना त्याचे व्यसन लागले आहे. तरुणांना चांगले भवितव्य देण्यासाठी आपण अंमली पदार्थांचे प्रकार नेस्तनाबूत केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT