Goa Pradesh Youth Congress "‘Behatar Bharat Buniyaad" Dainik Gomantak
गोवा

देशातून द्वेषपूर्ण राजकारण पुसून टाकण्यासाठी 'बेहतर भारत की बुनियाद’ मध्ये सहभागी व्हा

युवक द्वेष आणि विभाजनाचे राजकारण नष्ट करून बदल घडवू पाहत आहेत : जोएल आंद्राद्र

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Pradesh Youth Congress : देशासह गोव्यात बेरोजगारीची समस्या आहे. भाजप सरकार नोकऱ्या देण्यात अपयशी ठरले असून तरुणांनी ‘बेहतर भारत की बुनियाद’ या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि देशातून द्वेषपूर्ण राजकारण पुसून टाकण्यास मदत करावी,” असे आवाहन गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद्र यांनी केले.

गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरचिटणीस अहराज मुल्ला, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष महेश नादर, सोशल मीडिया प्रभारी देवसुरबी यदुवंशी उपस्थित होते.

आंद्राद्र म्हणाले, "देशातील युवक द्वेष आणि विभाजनाचे राजकारण नष्ट करून बदल घडवू पाहत आहेत. आपला देश आर्थिक, सामाजिक व राजकीय आव्हानांचा सामना करत आहे. 10 ते 12 जुलै दरम्यान बेंगळुरू येथे ‘बेहतर भारत की बुनियाद’ अधिवेशन होणार असून, त्यात युवक काँग्रेसचे सदस्य सहभागी होणार आहेत असे आंद्राद यांनी सांगितले.

सरचिटणीस अहराज मुल्ला म्हणाले की, "देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मजबूत पाया आवश्यक आहे. त्यासाठी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. या अधिवेशनापूर्वी आम्ही गोव्यात स्थानिक चर्चा करून हा प्रश्न समजून घेऊन तो सोडवण्यासाठी अधिवेशनाला उपस्थित राहू,” असे मुल्ला म्हणाले.

सोशल मीडिया प्रभारी देवसुरबी यदुवंशी यांनी युवकांना काँग्रेसच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये सामील होण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT