Goa Youth Satara Accident Dainik Gomantak
गोवा

Satara Accident: वाढदिनी साईबाबांच्या दर्शनाची इच्छा राहिली अपूर्ण; प्रवासातच काळाने गाठले, गोव्यातील युवकाचा साताऱ्यात अपघाती मृत्यू

Goa Youth Satara Accident: देवदर्शनासाठी शिर्डीला जात असताना नाईबाग, पेडणे येथील युवक भगवान उत्तम कासकर याचा सातारा येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Sameer Amunekar

पेडणे: देवदर्शनासाठी शिर्डीला जात असताना नाईबाग, पेडणे येथील युवक भगवान उत्तम कासकर याचा सातारा येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. विशेष म्हणजे, हा अपघात त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच घडला. या घटनेमुळं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भगवान कासकर हा शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आपल्या गाडीने निघाला होता. मात्र, नियतीने वेगळाच डाव खेळला. प्रवासादरम्यान, रात्रीच्या सुमारास साताऱ्यात गाडीचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, त्यात भगवानचा जागीच मृत्यू झाला.

भगवान वाढदिवसानिमित्त शिर्डीला दर्शनासाठी जात होता. परंतु, नियतीला ते मान्य नव्हते. काळाने भगवानला वाढदिवस साजरा करू दिला नाही. त्यापूर्वीच झडप घातली. वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाने त्याचं आयुष्य हिसकावून नेलं. संपूर्ण कासकर कुटुंबियांवर शोककळा पसरली. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT