Gorakhpur Railway Station 
गोवा

Goa Criminal Arrested: गोरखपूर रेल्वे स्थानकावर तीन पिस्तुलांसह गोव्यातील तरुणाला अटक, मुंबईतील गँगशी संबध असल्याचा संशय

Gorakhpur Railway Station: रेल्वे पोलिसांना विनयवर संशय आल्याने त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ तीन पिस्तूल आणि मॅग्झीन आढळून आले.

Pramod Yadav

उत्तरप्रदेश: गोरखपूर रेल्वे स्थानकावर गोव्यातील नागरिकाला अटक करण्यात आली आहे. संशयित नागरिकाजवळ तीन पिस्तूल आणि मॅग्झीन आढळून आली आहेत. गोरखपूर रेल्वे पोलिसांनी बुधवारी (३० ऑक्टोबर) ही कारवाई केली.

विनय हेब्बाळ (वय २५, रा. कुर्टी फोंडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गोरखपूर पोलिसांच्या माहितीने एका हिंदी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, संशयित विनय गोरखपूर रेल्वे स्थानकावर मुंबईच्या गाडीची वाट पाहत होता. रेल्वे पोलिसांना विनयवर संशय आल्याने त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ तीन पिस्तूल आणि मॅग्झीन आढळून आले. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असून, पुढील चौकशी केली जात आहे.

मुंबईतील गँगशी संबध असल्याचा संशय

संशयित विनयचा मुंबईतील गँगशी संबध असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यादृष्टीने देखील तपास केला जात आहे. त्याच्या विरोधात फोंडा पोलिस स्थानकात देखील एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दारु प्यायली, फ्रिजमधील खाद्यपदार्थ खाल्ले अन् पैसे, सोन्याचे दागिने चोरुन पसार झाले; पाजीफोंड येथे 9 लाखांची चोरी

पर्यटन हवयं, मृत्यूचा नंगानाच नको! गोव्यातील क्लब, पब्जसाठी ठोस कायद्याची गरज; 'करमणुकीचा कार्यक्रम' ही पळवाट बंद करा- संपादकीय

'इंडिगो'चा अहंकार अन् केंद्राचे लोटांगण! नियम मोडल्याने देशातील लाखो प्रवाशांना 'मनस्ताप'; सरकारवरही ओढावली नामुष्की-संपादकीय

Goa Crime: 'तलवार बाळगणे म्हणजे प्रतिबंधित शस्त्र नव्हे'! कोर्टाने केली दोन आरोपींची सुटका; पोलिसांचे फेटाळले आरोप

U-11 National Championships: बडोद्यात गोव्याचा डंका! 9 वर्षांच्या अमायरा धुमटकरने राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पटकावले 'ब्राँझपदक'

SCROLL FOR NEXT