businessmen chirag naik  Dainik Gomantak
गोवा

Konkani Bhasha Mandal: युवा उद्योजक चिराग नायक यांच्याकडून कोकणी भाषा मंडळाला 1 कोटी, ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Konkani Bhasha Mandal: उद्योगसमूह पाच कोटी रुपयांचा फावंटेनहेड चॅरिटेबल ट्रस्ट स्थापणार असून पाच कोटी रुपयाच्या व्याजातून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्यात येतील

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी : मडगावमधील युवा उद्योजक तथा समाजसेवक चिराग नायक यांनी आपले वडील उद्योजक व साहित्यिक दत्ता दामोदर नायक यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कोकणी भाषा मंडळाला एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

तसेच आपला उद्योगसमूह पाच कोटी रुपयांचा फावंटेनहेड चॅरिटेबल ट्रस्ट स्थापणार असून पाच कोटी रुपयाच्या व्याजातून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रा. भास्कर नायक यांची नियुक्ती केल्याचे तसेच डॉ. सुशीला मेंडीस, विजय हेदे व प्रशांत नाईक यांचा समावेश असेल असे जाहीर केले. या पत्रकार परिषदेला दत्ता दामोदर नायक व प्रा. भास्कर नायक उपस्थित होते.

असा वापरावा लागणार निधी

चिराग नायक यांनी पुढे सांगितले की, कोकणी भाषा मंडळाला ही देणगी देताना ही रक्कम कशी वापरावी या बद्दलच्या सूचना केल्या आहेत. या एक कोटी रुपयांतील ५० लाख रुपये बॅंकेमध्ये कायम स्वरुपी मुदत ठेव म्हणून ठेवावे व यातून मिळणाऱ्या व्याजातून चित्रंगी महिला मेळावा, सामाजिक परिषदा, कार्यशाळा आयोजित करावी.

उर्वरित ५० लाख रुपये असतील त्यातून प्रसिद्ध कोकणी साहित्यिकांच्या कथानकावर आधारित टेलिफिल्म तयार करावी. तसेच कोकणी भाषा मंडळाने कोकणीसाठी बालबोधीनी, प्रवेश, प्रबोध, प्रवीण, पंडित अशा पाच स्तरावरील परिक्षा घ्याव्यात, असेही चिराग नायक यांनी सुचविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT