goa monsoon news Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: सावधान! 'यलो अलर्ट' दोन दिवसांनी वाढला, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Goa Yellow Alert Extended: गोव्यातील हवामानाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने राज्यातील मान्सूनच्या वाढत्या प्रभावामुळे १९ ऑगस्टपर्यंत 'यलो अलर्ट' जाहीर केला

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील हवामानाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने राज्यातील मान्सूनच्या वाढत्या प्रभावामुळे १९ ऑगस्टपर्यंत 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे. यापूर्वी १७ ऑगस्टपर्यंतच अलर्ट देण्यात आला होता, पण आता तो आणखी दोन दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. यामुळे समुद्रकिनारी आणि नद्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा इशारा देण्यात आलाय.

पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच, अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. या दुहेरी कारणामुळे पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

goa monsoon news

गेल्या काही दिवसांपासून पणजीसह राज्याच्या अनेक भागांमध्ये रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता, पण आता हा पाऊस अधिक जोरदार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी ११ ते १४ ऑगस्टदरम्यान 'ग्रीन अलर्ट' होता, मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पूरप्रवण भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, मच्छीमारांनाही खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vote Chori: गोव्यात सापडले नेपाळी मतदार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा Ground Survey

Asia Cup 2025: संजू सॅमसन नाही, KL राहुल नाही; आशिया कपबाबत मोठी बातमी, माजी खेळाडूने केला खुलासा

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: 'गोविंदा रे गोपाळा..!'. डिचोलीतील विविध शाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

SCROLL FOR NEXT