Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: APK File डाउनलोड करणं पडलं महागात! आके येथील महिलेच्या बँक खात्यातून 6.5 लाख उकळले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Cyber Fraud: एपीके मालवेअर फाईल डाउनलोड करण्यास प्रवृत्त करून आके येथील एका ६३ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख ५१ हजार १०५ रुपये परस्पर काढून घेण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: एपीके मालवेअर फाईल डाउनलोड करण्यास प्रवृत्त करून आके येथील एका ६३ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख ५१ हजार १०५ रुपये परस्पर काढून घेण्यात आले.

या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वदेश देसाई पुढील तपास करीत आहेत.

नंदिनी गायतोंडे या तक्रारदार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने त्यांना एपीके फाइल डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर बँक खात्याशी जोडलेल्या क्रमांकावर अनेक ओटीपी संदेश आले.

हे संदेश त्यांनी दुर्लक्षित केले. मात्र, त्यानंतर खात्यातून पाच अनधिकृत व्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एकूण ६ लाख ५१ हजार १०५ रुपयांचे व्यवहार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT