Money Doubling Scam Dainik Gomantak
गोवा

Money Doubling Scam: मंत्र-तंत्राने पैसे दुप्पट करण्याचे आमिष; महिलेची 22 लाखांची पुंजी लुटणारी 'दुर्गामाता' गजाआड!

Rupees 22 Lakh Fraud: मंत्र-तंत्र विद्येच्या आधारे पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कुर्टी-फोंडा येथील एका महिलेला तब्बल २२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: मंत्र-तंत्र विद्येच्या आधारे पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कुर्टी-फोंडा येथील एका महिलेला तब्बल २२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी कोल्हापूर येथून संशयित महिला रूपाली सुनील पवार (४६) हिला अटक केली आहे. ती मूळची कर्जत-रायगड (महाराष्ट्र) येथील रहिवासी आहे. ‘दुर्गामाता’ या टोपणनावानेही ती वावरत असल्याचे समोर आले आहे.

आपल्याला तंत्र-मंत्र विद्येचे ज्ञान असून, लोकांची कामे चटकन करून देण्याची क्षमता आहे, अशी बतावणी संशयित रूपाली हिने केली होती. तक्रारदार महिलेच्या संपर्कात आल्यानंतर तिने तांत्रिक विद्येच्या साहाय्याने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. तिच्या या भुलथापांना बळी पडून तक्रारदार महिलेने मोठी रक्कम तिच्याकडे सोपवली. गेल्या ऑगस्ट महिन्यात हा प्रकार घडला.

त्यानंतर संशयित महिलेने तक्रारदार महिलेच्या घरात काही तरी खोटे तंत्र-मंत्र पुटपुटून पैसे दुप्पट होतील, असा बनाव केला. या विधीचा बहाणा करून सर्व रक्कम ताब्यात घेतल्यानंतर ती तेथून पसार झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार महिलेने फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे फोंडा पोलिसांनी तपास सुरू केला. एक पथक कोल्हापुरात दाखल झाले आणि तेथून रूपाली पवार हिला ताब्यात घेऊन फोंड्यात आणण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

‘दुर्गामाता’ नावाने वावर!

संशयित रूपाली पवार ही ‘दुर्गामाता’ या टोपणनावानेही वावरत असल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक विद्या अवगत असल्याचे भासवून लोकांची कामे चटकन करून देण्याची बतावणी ती करत असे. याच बतावणीचा आधार घेत तिने तक्रारदार महिलेला पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले आणि तिचा विश्वास संपादन केला.

आयुष्यभराची पुंजी गमावली

पैसे दुप्पट होण्याच्या आमिषाला बळी पडून तक्रारदार महिलेने आपली आयुष्यभराची जमवलेली २२ लाख रुपयांची पुंजी संशयित महिलेच्या हवाली केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. मोबाईलच्या आधारे तपास करत पोलिसांनी संशयितेला कोल्हापुरातून शोधून काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Garbage Problem: स्वच्छतेनंतर अवघ्या 24 तासांत पुन्हा कचरा! कारापूर पंचायतीचा इशारा धाब्यावर

Konkani Academy in Maharashtra: गोवा-महाराष्ट्राच्या नात्याला कोकणीचा सांस्कृतिक सेतू; महाराष्ट्रात स्वतंत्र कोकणी अकादमीसाठी CM सावंत फडणवीसांना पत्र लिहिणार

Rohit Sharma Record: रोहित शर्माचा पुन्हा एकदा फ्लॉप शो! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खराब फलंदाजी करत नोंदवला कारकिर्दीतील सर्वात लाजिरवाणा रेकॉर्ड

Goa Ujjwala Scheme: 'गोवा उज्ज्वला'च्या लाभार्थ्यांना 15 दिवसांत प्रत्येकी 3 हजार रुपये; मंत्री संकल्प आमोणकरांची ग्वाही

Majhe Ghar Scheme: 'माझे घर'च्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा; सनदानंतर परवान्यासाठी पंचायत मंडळाच्या मंजुरीची गरज नाही

SCROLL FOR NEXT