Goa Winter Update Dainik Gomantak
गोवा

Goa Winter Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, पुढील काही दिवस कसं असेल हवामान? वाचा

Goa Winter: राज्यात उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने मागील आठवड्यापासून थंडीचा जोर लक्षणीयरीत्या वाढला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने मागील आठवड्यापासून थंडीचा जोर लक्षणीयरीत्या वाढला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने सकाळी आणि रात्रीच्या वेळेत नागरिकांना थंडीचा अधिक त्रास जाणवत आहे. विशेषतः पहाटेच्या सुमारास थंड वाऱ्यांमुळे हुडहुडी भरविणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तीन दिवसांपूर्वी राज्यात यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्या वेळी किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात थोडी वाढ होऊन किमान तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

गोवा वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअसदरम्यान कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात मोठा बदल होण्याची चिन्हे नसली तरी थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम राहणार असल्याने थंडीची तीव्रता जाणवत राहील.

राज्यातील सर्वच भागांत रात्री थंडीचा जोर वाढला असून घाटालगतच्या भागांत ही थंडी अधिक जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, उबदार कपड्यांचा वापर करावा आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

SCROLL FOR NEXT