P. S. Sreedharan Pillai, Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Governor Speech: गेल्या 5 वर्षांत गोव्याची प्रगती 'उल्लेखनीय'! आर्थिक दिशा योग्य मार्गावर; राज्यपालांनी केले प्रशासनाचे अभिनंदन

P. S. Sreedharan Pillai: . अंत्योदय , ग्रामोदय आणि सर्वोदय या तत्त्वांवर आधारित कारभार केला जात आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी विधानसभेतील अभिभाषणात नमूद केले.

Sameer Panditrao

Governor P. S. Sreedharan Pillai Speech

पणजी: ‘डबल इंजिन सरकार’ची संकल्पना राज्याच्या यशाचा पाया आहे. अंत्योदय (सर्वात वंचित घटकांचा विकास), ग्रामोदय (गावांचा सर्वांगीण विकास) आणि सर्वोदय (समाजाचा समग्र विकास) या तत्त्वांवर आधारित कारभार केला जात आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी विधानसभेतील अभिभाषणात नमूद केले.

राज्यपाल म्हणाले, आपण आपल्या राज्य घटनेने दिलेल्या संधींचे महत्त्व समजून घेत, भारत आणि आपले सुंदर राज्य ‘विकसित भारत, विकसित गोवा @ २०४७’ घडविण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यायला हवा. ‘डबल इंजिन सरकार’ या संकल्पनेचा मुख्य आधार हा वेगवान आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा विकास असून, ‘अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय’ या तत्त्वांवर आधारित मजबूत मानवी विकासाचा पाया घालण्यात आला आहे.

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या अंमलबजावणीसाठी माझ्या सरकारने ‘समावेशक दृष्टिकोन’ स्वीकारला आहे, ज्यामुळे राज्यातील नागरिकांचे जीवन सुलभ झाले आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांच्या दशकपूर्ती महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी राज्य प्रशासनाचे अभिनंदन करतो. हा कार्यक्रम राज्याच्या मोठ्या क्षमतांचे द्योतक असून धार्मिक सौहार्दाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

गेल्या पाच वर्षांत गोव्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी गोव्याच्या सकल राज्य घरेलू उत्पादनाचा अंदाज १,२१,३०९.०२ कोटी रुपये आहे, जो १३.८७ टक्के वाढ दर्शवितो, तर २०२३-२४ मध्ये ही वाढ १३.७३ टक्के होती. यामुळे २०२४-२५ मध्ये गोव्यातील प्रतिव्यक्ति उत्पादन ७.६४ लाख एवढे असण्याचा अंदाज आहे, जे राज्याच्या सशक्त आणि स्थिर अर्थव्यवस्थेचे निदर्शक आहे.

ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत गोव्यातील थेट परदेशी गुंतवणूक १७४.७९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी झाली आहे. हे केवळ ‘डबल इंजिन सरकारच्या’ गुंतवणूक अनुकूल धोरणांमुळे शक्य झाले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात गोव्याचा निर्यात मूल्यानुसार आकडा एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत १.६१ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका पोहोचला आहे, जो २०२३-२४ मधील याच कालावधीत १.५२ अब्ज डॉलर्स इतका होता. त्यामुळे राज्याची आर्थिक दिशा योग्य मार्गावर असल्याचे स्पष्ट होते, असे राज्यपालांनी सांगितले.

शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात गोवा चौथा

१. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले की, नीती आयोगाच्या २०२४ च्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात गोव्याने ७७ गुण मिळवून चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. २०२१ मध्ये ७२ गुण होते, त्यामुळे राज्याच्या प्रगतीत वाढ झाल्याचे दिसते. या निर्देशांक २०२४ मध्ये गोव्याने चार उद्दिष्टांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर २०२१ मध्ये केवळ दोन उद्दिष्टांमध्ये हे स्थान मिळाले होते.

२. २०१८ ते २०२४ या कालावधीत गोवा १६ पैकी १२ निर्दशांकात ‘आघाडीदार’ किंवा ‘सिद्धहस्त’ श्रेणीत राहिला आहे. ही उल्लेखनीय उपलब्धी ‘स्वयंपूर्ण गोवा’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामुळे शक्य झाली आहे, जो लाभार्थी केंद्रित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देतो. स्वयंपूर्ण मित्रांनी अथक परिश्रम घेतले आहेत, जेणेकरून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचतील आणि ‘अंत्योदय’ संकल्पना प्रत्यक्षात येईल.

अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

सार्वजनिक प्रशासन उत्कृष्टतेसाठी आणि नागरिकांना उत्तरदायी, जबाबदार व पारदर्शक प्रशासन प्रदान करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन ९३१९८२८५८१ सुरू.

‘वन कार्ड, मेनी डेस्टिनेशन्स’ या संकल्पनेखाली स्मार्ट ट्रान्झिट कार्ड सुरू.

नोव्हेंबर २०२४ पासून ‘नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा’ सुरू.

रस्ता सुरक्षा वाढविणे, अपघात प्रवण ठिकाणे ओळखणे आणि त्वरित मदत पुरविणे यासाठी इलेक्ट्रॉनिक तपशीलवार अपघात अहवाल प्रकल्प सुरू.

‘गोवा राज्य अंतरिम भरपाई योजने’अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर २०२४ पर्यंत ५० रस्ता अपघात पीडितांच्या कुटुंबीयांना ९४.६० लाख रुपये अनुदान अदा.

सध्या १६६ योजनांचे थेट लाभ हस्तांतरण सुरू.

२०२४-२५ मध्ये नोव्हेंबर २०२४ पर्यंत गुन्ह्यांचा उकल दर ८८.३८% पर्यंत वाढला.

केपे, फातोर्डा, मायणा-कुडतरी, तसेच तेरेखोलच्या सागरी सुरक्षा पोलिस ठाण्याच्या इमारतींचे काम सुरू.

वाहतूक नियमभंग प्रकरणी २९.२८ कोटी रुपये दंड वसूल.

महिला सुरक्षेसाठी १०९१ महिला हेल्पलाईन आणि ७८७५७५६१७७ ही व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन कार्यरत.

‘टेली-मानस’ हेल्पलाईन २४/७ कार्यरत असून, मे २०२३ पासून १० हजारांहून अधिक कॉल्सना प्रतिसाद.

खोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मडगाव येथे मानसिक आरोग्य सेवा केंद्रे सुरू.

देशातील पहिले नेत्र शस्त्रक्रिया कक्ष साखळीच्या ‘सामुदायिक आरोग्य केंद्र’ येथे सुरू.

‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ प्रकल्पाअंतर्गत १ लाखाहून अधिक महिलांची स्तन कर्करोगाची तपासणी.

२०२५ पर्यंत ‘हिवताप निर्मूलन’ करण्याचे लक्ष्य.

‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’अंतर्गत गोव्यात आणखी १६ रुग्णालये समाविष्ट.

नोव्हेंबर २०२४ पर्यंत ११३ गरीब कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन.

७५ सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट्स सुरू.

११ नवीन फोरजी बीएसएनएल टॉवर्स सुरू.

‘लेट्स गोवा’ डिजिटल पोर्टल सुरू.

हलक्या प्रतीचे ५२ दशलक्ष टन खनिज विक्रीस.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असलेले भारतातील पहिले राज्य.

२०२४ मध्ये वन हक्क कायद्याखाली २०९ अर्ज मंजूर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT