गोव्याला जलवीज क्षेत्रात स्वयंपूर्ण (Self-sufficient in hydropower) बनविणे हे लक्ष्य ठेवले गेले आहे. Dainik Gomantak
गोवा

जलवीज क्षेत्रात गोवा बनणार स्वयंपूर्ण

गोव्यातील (Goa) खोल नद्या वीज निर्मितीसाठी पोषक असून विशेषतः मांडवीचे (Mandvi river) पात्र अनुकूल असल्याचे आढळले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: राज्याच्या जलश्रोत खात्याने (Water Resources Department) हल्लीच गोवा राज्य जलधोरण 2021(State Water Policy) अधिसूचीत केले असून त्यात स्वतःच्या जलश्रोताचा वापर करून जलविद्युत निर्मिती (Hydropower generation) करणे व त्यातून गोव्याला जलवीज क्षेत्रात स्वयंपूर्ण (Self-sufficient in hydropower) बनविणे हे लक्ष्य ठेवले गेले आहे.

ही सर्व प्रक्रिया पीपीपी तत्त्वावर आधारून असेल, पण पाणी व अन्य साधन सुविधांवर खात्याचा मालकी हक्क राहणार आहे असे या प्रस्तावाच्या धोरणवजा दस्तावेजात म्हटले आहे. त्या कागदपत्रानुसार केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या वीज सर्वेक्षणाप्रमाणे 2018-19 मध्ये गोव्याची वीज गरज अत्युच्च क्षणी 5572 मेक्रा युनिट होती. गोव्याची घरगुती वीज निर्मिती क्षमता ही कोळशावर आधारीत असून ती 65 मे.वॅ. आहे व उरलेली वीज राष्ट्रीय औष्णीक वीज महामंडळाशी केलेल्या करारानुसार मिळत होती. गोव्यातील खोल नद्या वीज निर्मितीसाठी पोषक असून विशेषतः मांडवीचे पात्र अनुकूल असल्याचे आढळले आहे. त्यामुळे हे प्रस्ताव गतिमान करण्याची गरज असल्याचे हा दस्तावेज म्हणतो.

शेजारी राज्यातील इंजिनिअरींग संस्थांची मदत

याबाबतचे संशोधन व जलश्रोत विकास यासाठी गोव्यात तशी संस्था नसल्याने शेजारी राज्यातील इंजिनियरींग व अन्य संस्थांना प्रोत्साहन दिले जाईल व राज्यातील संस्था व जलश्रोत खात्याचे कर्मचारी यांना तसे प्रशिक्षण देण्यास सांगितले जाईल असे या धोरणाच्या दस्तावेजात नमूद केले आहे. किनारपट्टी भागांत समुद्री पाण्यातील खारटपणा दूर करून ते पिण्यासाठी लोकांना उपलब्ध करण्याची शक्यता अजमावण्यावरही या धोरणात भर दिला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Reservation: गोवा विधानसभेत 'एसटी' आरक्षणाचा मार्ग मोकळा! गावडा, कुणबी अन् वेळीप समाजाला मिळणार हक्काचे राजकीय प्रतिनिधित्व; अंमलबजावणीस प्रारंभ

Mohan Bhagwat Speech: "जेन-झी ही प्रामाणिक पिढी; माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास!" 'आयआयएमयूएन'च्या परिषदेत सरसंघचालकांचे यांचे मोठे वक्तव्य

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT