Goa: रेतीतून प्लास्टिक वेगळे करणारे यंत्र विकसीत

'पीसीसी (PCC)’ अभियांत्रिकीच्या (Engineering) विद्यार्थ्यांचा उपक्रम; ‘स्माईल किपर फाउंडेशन संस्था (Smile Keeper Foundation)’ स्थापन, समुद्र किनाऱ्यावर रेतीत दडलेले प्लॅस्टिक (Plastic), मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीचे तुकडे, अशा प्रकारे प्लॅस्टिक रेतीसहित यंत्रात (Machine) घातल्या नंतर रेती वेगळी अन् प्लॅस्टिक वेगळे केले जाते.
टाकाऊतून टिकाऊचा ध्यास घेत युवा वर्गाने समुद्र किनाऱ्यावर पडणारे प्लास्टिक (Plastic) गोळा करून त्याचे नव्याने तयार केलेल्या यंत्रात घालून बारीक तुकडे करण्याचे यंत्र तयार केले.
टाकाऊतून टिकाऊचा ध्यास घेत युवा वर्गाने समुद्र किनाऱ्यावर पडणारे प्लास्टिक (Plastic) गोळा करून त्याचे नव्याने तयार केलेल्या यंत्रात घालून बारीक तुकडे करण्याचे यंत्र तयार केले.Dainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: आजचा युवक संशोधन (Research) करणारा नक्कीच आहे. नावीन्यांचा शोध घेण्यासाठी सतत धडपड करणारा युवा वर्ग गोव्याच्या (Goa) दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. टाकाऊतून टिकाऊचा ध्यास घेत युवा वर्गाने समुद्र किनाऱ्यावर पडणारे प्लास्टिक (Plastic) गोळा करून त्याचे नव्याने तयार केलेल्या यंत्रात घालून बारीक तुकडे करण्याचे यंत्र तयार केले. त्यामुळे समुद्रकिनारा स्वच्छ होत असून त्या प्लास्टिकचाही वेगळा वापर शक्य आहे. ही संकल्पना घेऊन विद्यार्थी गटाने अनोखे यंत्र (Machine) तयार करुन आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

टाकाऊतून टिकाऊचा ध्यास घेत युवा वर्गाने समुद्र किनाऱ्यावर पडणारे प्लास्टिक (Plastic) गोळा करून त्याचे नव्याने तयार केलेल्या यंत्रात घालून बारीक तुकडे करण्याचे यंत्र तयार केले.
Goa: कॅसिनो सुरु करण्याबाबत सरकार अनुकूल, उद्याच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

वेर्णा येथील पाद्री कॉसेसांव अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्माईल किपर फाउंडेशन ऑफ गोवा नावाची संस्था (एनजीओ) स्थापन केली. केवळ सामाजिक कार्य आणि अडल्या नडलेल्याना मदतीचा हात देण्यासाठी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक बुद्धीतून समुद्रकिनारी पडलेला प्लॅस्टिक कचरा साफ करण्यासाठी टाकाऊतून टिकाऊ प्रमाणे स्क्रॅब यार्डमधून सुटे भाग गोळा केले व त्यापासून छोटेसे हाताने चालविता येणारे यंत्र तयार केले. याचा खरा वापर समुद्र किनाऱ्यावर रेतीत दडलेले प्लॅस्टिक, मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीचे तुकडे, अशा प्रकारे प्लॅस्टिक रेतीसहित यंत्रात घातल्या नंतर रेती वेगळी अन् प्लॅस्टिक वेगळे केले जाते. याचा पहिला प्रयोग वेळसाव येथे समुद्र किनाऱ्यावर करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com