PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi: गोवा बनणार जागतिक अभ्यास केंद्र

दैनिक गोमन्तक

PM Narendra Modi: गोव्‍यातील एनआयटी आणि आयआयटी यामुळे गोवा हे आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील अभ्‍यास केंद्र म्‍हणून पुढे येणार आहे. गोवा हे फक्त जागतिक पसंतीचे पर्यटन स्थळच नव्हे, तर ही संत आणि कलाकारांची भूमीही आहे.

संत सोहिरोबानाथ आंबिये, आचार्य धर्मानंद कोसंबी, कृष्णंभट बांदकर असे विद्वान, भारतरत्न लता मंगेशकर, सूरश्री केसरबाई केरकर असे कलाकार, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ अशा अनेक दिगज्जांची ही पावन भूमी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते मडगाव येथील भव्य सभेत बोलत होते.

यावेळी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्रिगण- विश्र्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, रवी नाईक, माविन गुदिन्हो, नीळकंठ हळर्णकर, आलेक्स सिक्वेरा, रोहन खंवटे, गोविंद गावडे, सुभाष फळदेसाई, सुदिन ढवळीकर व मडगावचे आमदार दिगंबर कामत मंचावर उपस्थित होते.

तर नीलेश काब्राल, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, डॉ. दिव्या राणे, मायकल लोबो, दिलायला लोबो, डॉ. काशिनाथ शेट्ये, दाजी साळकर, उल्हास तुयेकर, गणेश गावकर, एनआरआय कमिशनर ॲड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, बाबू कवळेकर, सुलक्षणा प्रमोद सावंत हे जनतेमध्ये बसले होते.

दरम्यान, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दिन हे अनुपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार, या सर्वांना आमंत्रण देण्यात आले होते.

सर्वांत पुढे चर्चिल आलेमाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहकार्य करण्‍यासाठी गोव्‍यातील लोकसभेच्या दाेन्‍ही जागा निवडून द्या व सर्वांनी हात उंचावून माेदींना पाठिंबा द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्‍यावेळी सर्वांनी हात उंचावून मोदींना पाठिंबा दिलाच, पण त्यात सर्वांत प्रथम हात उंचावला तो माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी.

‘विकसित भारत’चे उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत, विकसित गोवा’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. या प्रदर्शनात १० स्टॉल्स उघडण्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी सर्व स्टॉ़ल्सना भेट देत स्वयंसेवकांकडून माहिती जाणून घेतली.

पंतप्रधानांनी उद्‌घाटन, पायाभरणी केलेले प्रकल्प

  •   कुंकळ्ळी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयआयटी), ३९० कोटींचा खर्च, ७,०७५० चौ.मी. जागा.

  •  राष्ट्रीय वॉटर स्पोर्ट्‌स इन्स्टिट्यूट (दोनापावल). ही देशातील या क्षेत्रातील पहिली संस्था. यातून कौशल्यावर भर. जलक्रिडा व जल पर्यटनाचा विकास. १६.५ एकर जमिनीत हा प्रकल्प उभारलेला आहे.

  •  सॉलिड कचरा व्यवस्थापन प्लांट - काकोडा, १७४ कोटी रुपयांचा प्रकल्प.

  •  कांपाल-पणजी ते रेईश-मागूसपर्यंत मांडवी पुलावरून रोप-वे - पर्यटकांना आकर्षण, पीपीपी तत्त्वावर २९० कोटी रुपयांचा प्रकल्प.

  •  शेळपे येथे १०० एमएलडी पाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प- ४९५ कोटी रुपयांचा प्रकल्प.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT