Babush Monserratte Dainik Gomantak
गोवा

गोव्याला 2027 पर्यंत कचरामुक्त करणार

बाबूश मोन्‍सेरात यांची घोषणा; पुढील आठवड्यात काकोडा प्रकल्‍पाची पाहणी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा राज्‍याला कचरा समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. वाढते पर्यटन, उद्योग, व्‍यापार आणि लोकवस्‍ती यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. राज्‍यातील प्रमुख शहरांसह किनारी भागात मोठ्या प्रमाणात ओला आणि सुका कचरा निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर कचरा व्‍यवस्‍थापन मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांना विचारले असता त्‍यांनी सांगितले की, राज्‍यातील कचऱ्याची समस्या लवकच संपुष्टात येईल. 2027 पर्यंत गोव्‍याला कचरामुक्‍त करण्यासाठी सरकार प्रयत्‍न करत आहे. त्‍यादृष्टीने नियोजन सुरु आहे. माझी कारकीर्द संपण्यापूर्वी राज्‍याला कचरामुक्‍त करु, अशी हमी बाबूश मोन्सेरात यांनी दिली.

राज्‍यातील पंचायतींना त्‍यांच्‍याकडे गोळा होणारा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करुन देण्याची सूचना केली आहे. विलग न केलेला कचरा प्रक्रिया केंद्राकडून स्‍वीकारला जाणार नाही, असेही मंत्री मोन्‍सेरात म्‍हणाले. घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्‍प मार्गी लागला की ही समस्या सुटेल. विलग केलेला ओला, सुका, इलेट्रॉनिक आदी कचऱ्यावर केंद्रात प्रक्रिया केली जाईल. काकोडा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्‍पाची पाहणी करण्यासाठी आपण पुढील आठवड्यात जाणार आहे. या केंद्रात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची 10 रोजी ट्रायल घेतली जाणार आहे. हा प्रकल्‍प निर्धारित वेळेत सुरू होईल, अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली.

बायंगिणी येथील नियोजित घनकचरा प्रकल्‍पासाठीच्‍या निविदा लवकरच काढण्यात येतील. या प्रकल्‍पासाठी तिसऱ्यांदा निविदा काढण्यात येत आहेत. पीपीपी तत्वावर होणाऱ्या या प्रकल्‍पासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च येणार असून बांधा, वापरा आणि हस्‍तांतरित करा या तत्वावर तो उभारण्यात येणार आहे. 10 वर्षे या प्रकल्‍पाची देखभाल आणि निगा संबंधित यंत्रणेकडून राखली जाईल, अशी माहिती मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांनी दिली.

बायंगिणी कचरा प्रकल्‍पाला होत असलेल्‍या विरोधाविषयी विचारले असता ते म्‍हणाले, आपण केवळ कचरा निर्माण करत आहोत. यामुळे समस्या निर्माण होऊन सर्वांनाच त्रास होत आहे. या प्रकल्‍पाला विरोध करण्याऐवजी यावर ठोस उपाय शोधणे आवश्‍यक आहे. विरोध करणाऱ्यांनी साळगाव येथील कचरा प्रकल्‍पाची पाहणी करावी. तेथील कामकाजाची माहिती घ्यावी, असा सल्लाही त्‍यांनी दिला. जागोजागी कचरा टाकण्याऐवजी त्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्‍प होणे आवश्‍यक आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. याचा विचार करून घनकचरा प्रकल्‍प लवकरात लवकर होणे, ही काळाची गरज असल्‍याचे मंत्री मोन्‍सेरात म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT