Goa Protect Environment  Dainik Gomantak
गोवा

Goa: एक वृद्धाश्रम असताना दुसऱ्या वृद्धाश्रम बांधण्याची गरज का ?

पर्यावरणाचा ऱ्हास करुन प्रकल्प लादला तर विरोधात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा चिंबलवासीयांनी दिला

Dainik Gomantak

Goa: चिंबल (Chimbel) येथे होणाऱ्या वृद्धाश्रमाला (Old age home) चिंबल येथील स्थानिक लोक तसेच बिगर सरकारी संस्थानी विरोध दर्शवला आहे. एक वृद्धाश्रम असताना दुसऱ्या वृद्धाश्रम बांधण्यासाठी या भागातील झाडे कापुन पर्यावरणाचा ऱ्हास (Environmental degradation) करण्याचा सरकार (Goa Govt) प्रयत्न आहे. त्यामुळे लोकांच्या विरोधात जाऊन सरकारने प्रकल्प जबरदस्तीने सुरू केल्यास प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन (Protest) करणार असल्याचा इशारा यावेळी चिंबलवासीयांनी दिला.

चिंबल येथे आधीच वृद्धाश्रम आहे, तोच सुस्थितीत नसल्याने बऱ्याच वृद्धांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त वृद्धाश्रमाची गरज नाही. जो वृद्धाश्रम आहे त्याच वृद्धाश्रमाची डागडुजी करून तो व्यवस्थितरीत्या चालवावा. विनाकारण वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करून, नवीन प्रकल्प उभारू नये, असे चिंबलवासीयांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

या प्रकल्पासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून कोणताच प्रस्ताव नसून या​ प्रकल्पाविषयी जि. पं. सदस्य तसेच पंचायत सदस्यांना कोणतीच माहिती नाही. केंद्र सरकारचा हा प्रकल्प चिंबलवासीयांवर लादला जात आहे. सार्वजनिक सहाय्य संस्थेच्या लोकपालच्या संचालकांना विचारले असता ते या​विषयी कोणतेच उत्तर द्यायला तयार नाही. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध आहे, असे बिगर सरकारी संस्था चिंबल मंचचे सचिव तुकाराम कुंकळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT