Goa Weather Updates Dainik Gomantaak
गोवा

Goa Weather Updates: पावसाची उसंत; आता राज्यात गुलाबी थंडी

राज्यात सर्वत्र दाट धुके शिवाय कुडकुडायला लावणारी थंडीही होती. त्यामुळे पहाटे फिरायला जाणारे लोक ऊबदार कपडे घालून येताना दिसत होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात पाऊस (Goa Rain) ओसरल्यानंतर आता गोवेकरांना गुलाबी थंडीची (Winter) अनुभूती मिळू लागली आहे. रविवारी राज्यात सर्वत्र दाट धुके शिवाय कुडकुडायला लावणारी थंडीही होती. त्यामुळे पहाटे फिरायला जाणारे लोक ऊबदार कपडे घालून येताना दिसत होते. एरवी पहाटे 30 हून अधिक अंश सेल्सिअस तापमान असते, ते काल 27 ते 29 अंशांपर्यंत खाली उतरले होते.

पुढील काही दिवस पावसापासून दिलासा मिळणार असला तरी गुलाबी थंडी झोंबणार आहे. गेल्या आठवड्यात राज्याला पावसाने झोडपून काढल्यानंतर आता धुके पडू लागले आहेत. त्यामुळे पाऊस ओसरेल, असा अंदाज आहे. हवामान वेधशाळेनेही पाऊस ओसरणार असल्याचे संकेत दिले आहेत. पहाटे राज्याच्या बहुतेक सर्वच भागांत सकाळी 8.30 वाजेपर्यंत दाट धुके होते. पुढील काही दिवस राज्यात असेच वातावरण असेल, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. कोणत्‍याही वादळाचा राज्यावर परिणाम होणार नाही. काही दिवस पाऊस उसंत घेणार आहे. मात्र, धुके कायम असेल, असेही हवामान खात्याच्या वेधशाळेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT