Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात तापमानाचा पारा घसरणार

राज्यात थंडीचा जोर वाढणार

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील हवामानात सतत बदल जाणवत आहेत. नागरिकांना ऐन थंडीत उष्म्याच्या झळा सोसाव्या लागल्या, येत्या दोन-तीन दिवसात थंडीचा जोर अधिक वाढणार असून किमान तापमान २ ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच पहाटे व सकाळी काही भागात धुके दाटणार आहे.

आज पणजी येथे कमाल ३२.८ अंश सेल्सिअस तर किमान २१.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात हळूहळू थंडीचा जोर वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्‍यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहेत. पुढील चार-पाच दिवस हवामानात मोठे काही बदल घडणार नाहीत. त्यासोबतच वातावरण कोरडे राहणार आहे.

राज्यातील परतीच्या पावसाला उशीर झाला. त्यानंतर मान्सुनोत्तर कालखंडात पावसाची बरसात झाली. त्यामुळे यंदा थंडीला उशिरा सुरुवात झाली. मात्र, नंतर मंडूस आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे थंडी कमी झाली आणि अजूनदेखील राज्यात म्हणावी तशी थंडी पडलेली नाही.

राज्यातील गेल्या 50 वर्षांतील हिवाळी तापमानाचा विचार करता सर्वाधिक उष्ण हिवाळा हा 2019 सालचा होता. गेल्या दोन वर्षांत हिवाळ्यात सामान्य तापमान होते. यंदादेखील तसे सामान्य तापमानच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT