Goa Maximum Temperature Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Forecast: राज्यात तापमानाचा पारा काही अंशी घटणार! अनेक भागांत अवकाळी पाऊस; उष्म्यापासून मिळणार दिलासा

Goa Maximum Temperature: राज्यात दोन-तीन दिवसांपासून उष्म्याच्या झळा तीव्र झाल्या असून दिवसासोबतच रात्री मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यात दोन-तीन दिवसांपासून उष्म्याच्या झळा तीव्र झाल्या असून दिवसासोबतच रात्री मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत आहे. कमाल तापमानाचा पारा ३६.२ अंशांवर पोहोचला परंतु पुढील दोन दिवस राज्यातील तापमानाचा पारा घटणार असून कमाल तापमान ३३ ते ३४ अंशांवर जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली. काही भागात संध्याकाळी आणि रात्री ताशी ३० ते ४० किमी वाऱ्याच्या वेगाने पाऊस पडण्याची शक्यता आहे.

धारबांदोड्यात सर्वाधिक पाऊस

राज्यात मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला होता परंतु शुक्रवारी पहाटे राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला. धारबांदोड्यात सर्वाधिक १२.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल सांखळी ४.८ मिमी, मडगाव ४.४ मिमी, सांगे४.३ मिमी, म्हपास ४ मिमी, दाबोळी ३.६ मिमी, काणकोण ३.२ मिमी, जुने गोवा आणि फोंडा अनुक्रमे २.३ मिमी आणि मुरगाव येथे १.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

आंबा पिकाला तडाखा

राज्यात मोठ्या प्रमाणात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात सत्तरी, डिचोली परिसरात आंब्याच्या पीकाचे नुकसान झाले आहे. काही दिवसांनी उतरविण्यात येणारे हे आंबे जोरदार पडलेल्या पावसाच्या तडाख्याने नुकसान झाले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्याने हवेत गारवा आहे परंतु पुढील दोन-तीन दिवस राज्यात उष्मा जाणवेल तसेच संध्याकाळी आणि रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- नहुष कुलकर्णी, संचालक, गोवा वेधशाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT