Goa Weather Update  Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update : राज्यात दोन दिवस दमदार ‘कोसळधारा’; आज-उद्या ऑरेंज अलर्ट

Goa Rain : राज्यात मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे भात रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला असून बहुतांश भागांत दमदार पाऊस पडत आहे.

पुढील दोन दिवस (ता. १३ आणि १४ जुलै) राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण १७३५.६ मिमी म्हणजेच ६८.३३ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत राज्यभरात २८.१ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

भात रोपांचे नुकसान

राज्यात मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे भात रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हळदणवाडी-मये येथे भाताचा तरवा (रोप) लावलेल्या गाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुमारे ८० टक्क्‍यांहून अधिक रोपे कुजली असून पुन्हा नव्याने रोपे लावावी लागणार आहेत. अनेक ठिकाणी पडझडही झाली.

सांगेत सर्वाधिक ४.९३ इंच पाऊस

मागील २४ तासांत सर्वाधिक १२५.४ मिमी म्हणजेच ४.९३ इंच पावसाची नोंद सांगे येथे करण्यात आली. याखालोखाल वाळपई ९७.२ मिमी, साखळी ९३.४ मिमी, फोंडा ८८.४ मिमी, पणजी ७९.१ मिमी, केपे ७४ मिमी, जुने गोवे ७३ मिमी, दाबोळी ७२.६ मिमी, मुरगाव ७१.४ मिमी, पेडणे ६०.४ मिमी, म्हापसा ४५.२ मिमी, तर काणकोण येथे २८.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

Vaibhav Mangle At IFFI: वैभव मांगलेनी गोव्याचे केले कौतुक; म्हणाले की 'सुंदर वातावरणात....'

IFFI Goa 2024: अम्मास प्राईड ठरला चित्रपट महोत्सवातील एकमेव LGBTQ सिनेमा; "सामाजिक बदल घडवायचे आहेत" नवख्या दिग्दर्शकाचे प्रयत्न

Cortalim: यापुढे 'मेगा प्रकल्पां'ना परवानगी नाही! कुठ्ठाळी ग्रामसभेचा एकमुखी ठराव

SCROLL FOR NEXT