Vaibhav Mangle At IFFI: वैभव मांगलेनी गोव्याचे केले कौतुक; म्हणाले की 'सुंदर वातावरणात....'

IFFI 2024: पर्यटकांचा स्थानिकांना अजिबात त्रास होऊ नये, असे मत मराठी अभिनेता, नाटककार आणि कलाकार वैभव मांगले यांनी व्यक्त केले. तसेच युवकांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, असा संदेश दिला.
Vaibhav Mangle
Vaibhav Mangle At IFFIX
Published on
Updated on

Vaibhav Mangle At IFFI 2024

पणजी: गोव्यात वाढत्‍या पर्यटनामुळे स्थानिकांसाठी निर्माण होणाऱ्या समस्या समजून घेऊन, जे नियम राज्य सरकारने लागू केले आहेत, ते योग्य आणि आवश्यक आहेत.

पर्यटकांचा स्थानिकांना अजिबात त्रास होऊ नये, असे मत मराठी अभिनेता, नाटककार आणि कलाकार वैभव मांगले यांनी व्यक्त केले. तसेच युवकांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, असा संदेश दिला.

वैभव मांगले म्हणाले की, गोवा हा कोकणाचा भाग असूनही येथील वातावरण वेगळे असल्याचे नेहमीच जाणवते. गोव्याच्या सुंदर वातावरणात कला आणि पर्यटनाचा सुंदर संगम इफ्फीमुळे पाहण्यात आला.

Vaibhav Mangle
IFFI 2024: मराठी कलाकारांची 'शोलेला' मानवंदना! अभिनेत्री प्राजक्ता दातारने म्हणला Iconic Dialogue; ‘बसंती, इन कुत्तों के सामने..'

अभिनायाव्यातिरिक्त मला चित्रकलेची आवड आहे. प्रत्येक कलाकारांनी इतर कलांवर देखील प्रेम करायला हवे. चित्रकला,नाटक आणि सिनेमा यांच्यातील परस्पर संबंधांवर भर देत मांगले यांनी प्रत्येक कलाकाराने इतर कलेला देखील प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः मराठी भाषेतील लिखाणाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे वैभव मांगले यांनी सांगितले.

जानेवारी महिन्यात माझ्या नाटकाचे प्रयोग गोव्यात होणार आहेत. गोव्याने आजवर आम्हा कलाकारांना सन्मान दिला आहे. यापुढेही असाच आदर आम्हाला मिळेल अशी खात्री आहे.

वैभव मांगले, मराठी अभिनेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com