Onion Rate Dainik Gomantak
गोवा

Onion Rate : पावसामुळे वाढला कांद्याचा दर; टोमॅटोही महाग

Onion Rate : वालपापडी अजूनही खातेय भाव

गोमन्तक डिजिटल टीम

Onion Rate :

पणजी, राज्यात दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढतच आहेत. कांदा, टोमॅटो तसेच बटाट्याचे दर स्थिर होते परंतु गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढ होत आहे.

पणजी बाजारात ४० रूपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याच्या दरात दहा रुपयांनी वाढ होऊन तो आता ५० रूपये प्रती किलो दराने विकला जात आहे. कांद्याने पन्नाशी गाठवी तर टोमॅटोने साठी गाठली आहे.

पावसामुळे टोमॅटो आणि कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात. पणजी बाजारात वालपापडी २४० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. लसूण ४०० रुपयांवर गेली आहे.

बाजारात मानकुराद, हापूस, केसरी तसेच इतर विविध जातींचे आंबे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. आवक वाढल्‍याने आंब्यांच्या दरात घट झाली आहे. यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीला अडीच ते तीन हजार रुपये डझन दराने विकला गेलेला मानकुराद आंबा आता ५०० ते ७०० रुपयांवर आला आहे. हापूस ४०० तर विविध जातींचे आंबे ३०० रुपये डझन दराने विकले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्समध्ये मोठा फेरबदल? हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात, आता सूर्या नव्हे तर तिलक वर्माकडे संघाची धुरा!

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

गाळ उपसा कामात मोठा भ्रष्टाचार, तुये शेतकरी संघटनेकडून सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT