Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात भरली हुडहुडी! 1970 नंतर पहिल्यांदाच पारा ऐवढा खाली घसरला

Cold Wave in Goa: राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेले हवामानातील बदल आता स्थिरावले असून मागील काही दिवसांपासून बऱ्यापैकी थंडी पडायला सुरवात झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Winter Weather Update:

पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेले हवामानातील बदल आता स्थिरावले असून मागील काही दिवसांपासून बऱ्यापैकी थंडी पडायला सुरवात झाली आहे. उपलब्ध नोंदींनुसार डिसेंबर महिन्यात १९७० साली किमान तापमानाचा पारा १८.०५ अंशांवर गेला होता. त्यानंतर मंगळवारी राज्यात १८.०६ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

जी मागील पन्नास वर्षांमधील डिसेंबर महिन्यामधील सर्वांत किमान तापमान आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये पावसाने सर्व विक्रम मोडत नवे उच्चांक नोंदविले. तशीच स्थिती आता यंदाचा हिवाळादेखील नोंदविणार असल्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा राज्यात बऱ्यापैकी आणि खूप काळ थंडी जाणवणार आहे. त्यामुळे निश्‍चितपणे यंदा थंडीचा जोर कायम राहण्याची अधिक शक्यता आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा थंडी पडायला सुरवात झाली असून यंदा हिवाळ्यात चांगली थंडी असणार आहे. मंगळवारी किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे येत्या काळात अजून तापमान (Temperature) घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- एम. आर. रमेशकुमार, शास्त्रज्ञ (निवृत्त) एनआयओ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT