goa rain news today Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Goa weather update: तुळशी विवाहाच्या तयारीच्या कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला, मात्र आता हवामान खात्याने स्थानिकांना आनंदाची बातमी दिली आहे

Akshata Chhatre

Goa Rain News: दिवाळी सरली तरीही राज्यातील जनतेचा आवडता सण, 'व्हडली दिवाळी' म्हणजेच तुळशी विवाह झाल्याशिवाय गोव्यातील सणाचा उत्साह कमी होत नाही. सध्या हेच तुळशीचं लग्न अगदी तोंडावर असताना शुक्रवारी दिवसभर पडलेल्या बिगर मोसमी पावसामुळे नागरिकांच्या उत्साहावर पाणी फिरले. तुळशी विवाहाच्या तयारीच्या कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला, मात्र आता हवामान खात्याने स्थानिकांना आनंदाची बातमी दिली आहे.

पुढील सात दिवस पावसाची शक्यता नाही

शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता, तर शनिवारी देखील काही भागांत सकाळपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मात्र, याच दरम्यान हवामान विभागाने एक दिलासादायक अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्यानुसार, पुढील सात दिवस राज्यात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे रविवारच्या (ता. २) तुळशी विवाह समारंभाला पावसाचा कोणताही अडथळा येणार नाही, अशी आशा आहे. पावसामुळे खोळंबलेली तुळशी वृंदावन रंगवणे आणि इतर सजावटीची कामे आता नागरिकांना त्वरित पूर्ण करता येणार आहेत.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, कृषी अधिकारी पाहणीत व्यस्त

हा बिगर मोसमी पाऊस केवळ सणाच्या तयारीलाच नाही, तर शेतकऱ्यांसाठीही मोठे नुकसान घेऊन आला आहे. विशेषतः पेडणे तालुक्यातीलशेकडो शेतकऱ्यांना यंदा प्रथमच या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे उभी पिके आडवी पडली, ज्यामुळे काढणीचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी तर पिके पूर्णपणे खराब न होता, ती पुन्हा रुजून बहरताना दिसत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी खात्याचे धिकारी गावागावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत असले तरीही काढणीच्या वेळी पीक खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी अद्याप कमी झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT