Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण, पारा 34 अंशांवर; शनिवारी पावसाची शक्यता

Goa Weather: राज्यात मागील दोन-तीन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात उष्मा वाढत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात मागील दोन-तीन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात उष्मा वाढत आहे. वाढते तापमान आणि आर्द्रतेमुळे घराबाहेर पडणे कठीण होत असून दुपारी घामाच्या धारा लागत आहेत. शुक्रवारी राज्यातील हवामान कोरडे राहणार असून कमाल तापमान ३५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता गोवा वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.

त्यासोबतच शनिवारी, २१ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता आहे. काल पणजी येथे कमाल ३४.२ अंश सेल्सिअस, तर किमान २४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यासोबतच आर्द्रता ७४ टक्के इतकी होती. कमाल तापमानात १.६ अंशांनी वाढ नोंदविण्यात आली.

वाढत्या उष्म्यात ही घ्या काळजी

राज्यात मार्च महिन्यात जे सामान्य कमाल तापमान असायला हवे, तेवढेच सध्या आहे; परंतु हे तापमान ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना असह्य वाटू शकते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

वाढलेल्या आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात घाम येतो. त्यामुळे या काळात सैल व सुती कपडे वापरणे योग्य ठरते.

दुपारी १२ ते सायंकाळी ४ वा. या कालावधीत उष्मा अधिक असल्याने थेट सूर्यकिरणांखाली येणे किंवा खुल्या जागेत काम करणे टाळावे.

उन्हाळ्यात निर्जलीकरणामुळे चक्कर येणे, डोकेदुखी असे प्रकार घडतात; त्यामुळे या काळात भरपूर पाणी व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT