Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार! वेधशाळेने दिला इशारा; 14 तारखेपासून यलो अलर्ट

Goa Monsoon: गोवा वेधशाळेने राज्यात आगामी आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. विशेषतः १४ ते १७ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा वेधशाळेने राज्यात आगामी आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. विशेषतः १४ ते १७ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, रविवारी राज्याच्या अनेक भागांत हलक्या सरींची नोंद झाली. पणजी शहर आणि आसपासच्या परिसरात दिवसभर रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण कायम राहिले.

वेधशाळेने यापूर्वी ११ ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘ग्रीन अलर्ट’ घोषित केला होता. मात्र, हवामानातील बदलानुसार हे अलर्ट तासातासाने अद्ययावत केले जात असल्याने सोमवारी अलर्टमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता वाढू शकते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे,

तसेच नद्यांच्या किनारी किंवा पुरग्रस्त भागात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेती, मासेमारी आणि वाहतूक क्षेत्रांनाही हवामानातील बदलांसाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT