Rain Alert In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात 7 दिवस यलो अलर्ट! वादळी वाऱ्यासह 'कोसळधार' बरसणार

Rain Alert In Goa: राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, हवामान खात्याने गोव्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून, अनेक भागांत जोरदार सरी कोसळत आहेत.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, हवामान खात्याने गोव्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून, अनेक भागांत जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं १७ मेपासून २३ मेपर्यंत 'यलो अलर्ट' जारी केला असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवात पुढील काही दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीत ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

शिरोड्यात अवकाळी पाऊस

शनिवारी शिरोडा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या सरींमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांची मोठी धावपळ उडाली.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यांच्या वेळी झाडांखाली किंवा असुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे टाळावे, तसेच वीज चमकत असताना खुल्या मैदानात थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT