Goa Water Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Water Taxi: ट्राफिक जॅमची समस्या विसरा… गोव्यात 4 जलमार्गांवर सुरु होणार वॉटर टॅक्सी सेवा; थेट पाण्यातून करता येणार प्रवास

Water Taxi Goa: रस्त्यांवरील वाढती रहदारी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पणजी ते सावर्डे, पणजी ते वळवई, पणजी ते हळदोणे, पणजी ते मुरगाव अशा जलमार्गांवर प्रवासी सेवा येत्या तीन - चार महिन्यांत सुरू होऊ शकते.

Sameer Amunekar

पणजी: रस्त्यांवरील वाढती रहदारी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पणजी ते सावर्डे, पणजी ते वळवई, पणजी ते हळदोणे, पणजी ते मुरगाव अशा जलमार्गांवर प्रवासी सेवा येत्या तीन - चार महिन्यांत सुरू होऊ शकते. त्यासाठी आवश्यकता म्हणून राज्य सरकारने नदी परिवहन खात्याचे ‘अंतर्गत जलमार्ग खाते’ असे बारसे केले आहे.

खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी सांगितले, की मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज दिल्लीत केंद्रीय अंतर्गत जल वाहतूकमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन वॉटर टॅक्सीबाबत चर्चा केली. केंद्र सरकारने तातडीने माहिती सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार याच महिन्यात आवश्यक ती सारी माहिती सादर करण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने खात्याच्या नामकरणावर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, आजवर हे खाते बंदर कप्तान खात्याच्या अंतर्गत होते. आता ते खाते स्वतंत्र संचालकांच्या अधिपत्याखाली चालेल. नदी परिवहन खात्याचे कर्मचारी नव्या खात्यात आपोआप वर्ग होतील.

सचिवालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉटर टॅक्सी सुरू करण्याची जबाबदारी याअंतर्गत जलवाहतूक खात्याकडे सोपवली जाणार आहे. या वॉटर टॅक्सीचा अभ्यास करण्यासाठी नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी कोचीचा दौरा केला आहे.

१४ जुलै रोजी रो रो फेरीबोटीचे उद्‍घाटन झाल्यानंतर ते कोची येथे जाणार आहेत. केंद्र सरकारने राजेभोसले यांची नोडल अधिकारी म्हणून या प्रकल्पासाठी नियुक्ती केली असून कोची मेट्रोकडे शक्याशक्यता अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

पणजी-सावर्डे प्रवास अर्ध्या दिवसात

पणजी-सावर्डे जलमार्गावर प्रवासी वाहतूक सुरू केल्यास तो प्रवास अर्ध्या दिवसात कसा करता येईल, याचा अभ्यास केला जाणार आहे. रायबंदर, जुने गोवे, कुंभारजुवे, कुंडई, डोंगरी, मडकई, उंडीर, दुर्भाट, बोरी, रायतूर, मानकी आणि सावर्डे येथे थांबे गृहित धरण्यात आले आहेत.

वाहतूक नियम भंगावर खासगी कंपनीची नजर

राज्यात वाहतूक सिग्नलचा भंग करणाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यासाठी खासगी कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. या दंडात्मक कारवाईच्या महसुलातील काही वाटा या कंपनीस मोबदल्याच्या स्वरूपात देण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT