Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Goa Water Supply: 'प्रत्येकाला सरासरी 12 तास पाणीपुरवठा करू', मंत्री फळदेसाईंचा दावा; गळती कमी करण्यासाठी ठोस पावले उचलणार

Subhash Phaldesai: पेयजल खात्याच्या कार्यालयाबाहेर संवाद साधताना मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, सध्या राज्यात ३२५ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील केवळ ९ टक्के लोकसंख्येलाच दिवसातून चार तासांपेक्षा कमी काळ पाणीपुरवठा मिळतो, असा दावा पेयजल विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला आहे. पुढील सहा महिन्यांत राज्यातील प्रत्येक ग्राहकाला सरासरी १२ तासांचा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आल्तिनो येथे पेयजल खात्याच्या मुख्य कार्यालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, सध्या राज्यात ३२५ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यापैकी किमान ४० टक्के ग्राहकांना १८ तासांपेक्षा जास्त पाणीपुरवठा, तर २४ टक्के ग्राहकांना दिवसभर सतत पाणी मिळते. याशिवाय ४५ टक्के लोकांना दिवसातून आठ तास पाणी मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री म्हणाले की, विभागाने नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत अनेक बाबींचा ऊहापोह केला असून १५ दिवसांत सविस्तर अहवाल तयार केला जाईल. त्याआधारे पाणीपुरवठ्यातील कमतरता दूर करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातील. विशेषत: राज्यातील पाण्याच्या गळतीचे प्रमाण सध्या ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे सरकारचे प्रयत्न असतील.

राज्यापुढील उद्दिष्ट असे...

राज्यातील पाण्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात अधिक पाणी उपलब्ध करून देणे, गळतीतून होणारे नुकसान रोखणे आणि पुरवठा तासांमध्ये लक्षणीय वाढ करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असेल, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

Mangal Aditya Rajyoga 2026: 2 एप्रिलला महाधमाका! 'मंगळ-आदित्य' राजयोगामुळे उजळणार 'या' 3 राशींचे भाग्य; धनवर्षावासह होणार प्रगतीचे नवे मार्ग खुले

Goa Cabinet 2026: 'म्हजे घर' योजनेसाठी जमीन महसूल कायद्यात बदल, फोंडा पोटनिवडणुकीनंतर रिक्त मंत्रिपद भरणार; मुख्यमंत्री सावंतांनी स्पष्टच सांगितलं

फर्स्ट क्लासमध्ये ठोकलं ताबडतोब शतक, RR कडून खेळला, आता विकत घेतली अख्खी टीम! कोण आहे RCB चा नवा चेअरमन?

SCROLL FOR NEXT