Goa Water Supply: No water supply in Panjim

 
Dainik Gomantak
गोवा

जलवाहिनी फुटल्याने पणजीत 'पाण्यासाठी' वणवण!

बांबोळीतील इस्पितळावर याचा मोठा परिणाम जाणवला.

दैनिक गोमन्तक

फोंडा: राजधानीला पाणी पुरवणारी (Goa Water Supply) बाणस्तारी येथील जलवाहिनी फुटल्याने पाण्यासाठी या भागातील लोकांना बुधवारी वणवण करावी लागली. मंगळवार, 21 रोजी दुपारी साडेतीन वाजता ही जलवाहिनी फुटल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी तसेच बुधवारी पूर्ण दिवस राजधानी आणि परिसरातील पाणीपुरवठा ठप्प झाला. विशेषतः बांबोळीतील इस्पितळावर याचा मोठा परिणाम जाणवला.

जलवाहिनीची (Water supply) दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात आली. मात्र जवळच आणखी एका ठिकाणी ती फुटल्याचे निदर्शनास आल्याने आता हे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे गुरुवार, 23 तारखेपर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याचे या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पणजी (Panjim), ताळगाव, सांताक्रूझ तसेच सांत आंद्रे वीज खात्याचे खांब उभारताना निष्काळजीपणा दाखवल्यामुळेच त्याचा फटका ग्राहकांना बसला आहे.

वीज खात्याचे (Electricity Department) खांब उभारताना संबंधित कंत्राटदाराने कोणतीच काळजी घेतली नाही. त्यामुळे जलवाहिनीला भोक पडले. वास्तविक वीज खात्याचे हे काम करताना योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्‍यकता होती.

सरकारी काम कशाप्रकारे चालते, त्याचा हा उत्कृष्ट नमुना असून विपरित परिणाम झाल्यानंतर मात्र धावाधाव करावी लागली. विशेष म्हणजे राजधानी व बांबोळीला पाणीपुरवठा ठप्प झाल्याने लोकांचे बरेच हाल झाले. काही ठिकाणी तर पाण्याचे टँकर पुरवण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली.

विजेचे खांब बसवताना ड्रिल मशीन लागल्याने ही जलवाहिनी फुटली. ती रातोरात दुरुस्त केली. मात्र दुसऱ्या ‍ ठिकाणी परत जलवाहिनी फुटल्याने ही संपूर्णच जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. गुरुवार सकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि गुरुवारीच नागरिकांना पाणी मिळेल.

-दीपक पाऊसकर

सार्वजनिक बांधकाम मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT