Water Metro in India Dainik Gomantak
गोवा

Water Metro Goa: वॉटर मेट्रोमुळे 'पर्यटनाला' मिळणार चालना! मंत्री फळदेसाईंनी व्यक्त केली आशा; कोचीत जलमार्गावर केला प्रवास

Water Metro In Goa: गोवा राज्यातील वाहतूक व पर्यटन क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘वॉटर मेट्रो प्रकल्प’ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला.

Sameer Panditrao

कोची: गोवा राज्यातील वाहतूक व पर्यटन क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘वॉटर मेट्रो प्रकल्प’ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात त्यांनी नुकतीच कोची मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRL)च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

गोव्यात सुमारे ९० किलोमीटर लांबीचे अंतर्गत जलमार्ग आहेत. तसेच राज्यात अनेक बेटं आहेत जी पर्यटनासाठी लोकप्रिय झालेली आहेत. जिथे जलमार्गांनीच जाणे सोयीस्कर आहे. अशी ठिकाणे वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून जोडल्यास राज्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि प्रदेशाचा सर्वांगीण विकास होईल, असे फळदेसाई यांनी सांगितले.

मंत्र्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचबरोबर, फळदेसाई यांनी KMRL चे व्यवस्थापकीय संचालक लोकनाथ बेहरा यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन वॉटर मेट्रोची व्यवहार्यता व तांत्रिक बाबी यावर चर्चा केली. लवकरच या संदर्भातील अहवाल (Feasibility Report) मिळण्याची अपेक्षा आहे.

या प्रतिनिधी मंडळात गोव्याच्या नदी परिवहन विभागाचे संचालक विक्रमसिंह राजे भोसले यांच्यासह इतर अधिकारी सहभागी होते.

दौऱ्यादरम्यान प्रतिनिधी मंडळाने हायकोर्ट ते फोर्ट कोची असा वॉटर मेट्रो प्रवास करून या प्रकल्पाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

फळदेसाई यांनी सांगितले की, कोचीतील वॉटर मेट्रो हा यशस्वी प्रकल्प ठरला असून त्याचा अनुभव गोव्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी आदर्श ठरू शकतो. “गोव्यातील अंतर्गत जलमार्गांचा योग्य वापर करून, पर्यटनास चालना देत स्थानिकांना पर्यावरणपूरक व सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे,” असे ते म्हणाले.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर गोवा केवळ पर्यटन क्षेत्रातच नव्हे तर स्थानिक वाहतुकीच्या दृष्टीनेही देशासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT