भाजप कार्यकर्ते Dainik Gomantak
गोवा

आमदार सोपटेंनी नव्हे तर विजय सरदेसाईंनी गोवा विकायला काढला होता; BJP

गोवेकाराना विजय सरदेसाई विषयी सर्व काही माहित आहे , त्यांनी मान्द्रेत येवून हवेत गोळी बार मारू नये असा सल्ला दिला.

दैनिक गोमन्तक

मोरजी: गोवा फॉरवर्ड (Goa Forward) चे आमदार ज्यावेळी मंत्री असताना पूर्ण गोवा (Goa) आणि जमिनी विकायला काढल्या होत्या , ज्यावेळी भाजपा सरकारात (BJP) ते मंत्री होते त्यावेळी ते भाजपचे गुणगान गायचे आता मंत्रिपद गेल्यामुळे ते वैफल्ग्रस्त झाले आहे ,आमदार दयानंद सोपटे यांनी नव्हे तर विजय सरदेसाई यांनी गोवा विकायला काढला होता असा दावा मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी मांद्रे येथे भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परीशदेत केला. यावेळी किसान मोर्चा अध्यक्ष दत्ताराम ठाकूर, सदस्य मच्छिंद्र पेडणेकर, गोविंद आजगावकर, सुनील आसोलकर, महेश मांद्रेकर, रवींद्र गोवेकर आदी उपस्थित केले. (Goa was sold by Vijai Sardesai)

भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी बोलताना मंत्री असताना विजय सरदेसाई यांचे अनेक कारनामे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वारंवार काढले होते ,मंत्री असताना सरकारचा पुरेपूर फायदा घेतला जमिनीची प्रकरणेही लोकाना माहित आहे , आणि आता त्यांच्याकडील सत्ता गेल्यानंतर काही लोकाना घेवून तो मांद्रे मतदार संघात येतो आणि आमदार दयानंद सोपटे यांच्यावर टीका करतो , गोवेकाराना विजय सरदेसाई विषयी सर्व काही माहित आहे , त्यांनी मान्द्रेत येवून हवेत गोळी बार मारू नये असा सल्ला दिला.

रवींद्र पेडणेकरयांनी बोलताना मान्द्रेतील जनता सुजाण आहे , आमदार विजय सरदेसाई यांनी या भागात येवून जनतेची दिशाभूल करू नये , मान्द्रेत जो मनोरंजन प्रकल्प होत आहे , त्याविषयी आमदार दयानंद सोपटे यांनी स्थानिकाना विश्वासात घेवून प्रकल्पाचा आराखडा मांडलेला आहे . या प्रकल्पातून स्थानिकाना रोजगाराची संधी मिळेल असा दावा पेडणेकर यांनी केला . या प्रकल्पात फिल्म सिटी होणार , तारांकित हॉटेल ,सभाग्रह होणार आहे .

दत्ताराम ठाकूर

भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष दत्ताराम ठाकून यांनी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व स्थानिक आमदार दयानंद सोपटे याना जनतेची जाण आणि हित माहित आहे जे काही प्रकल्प आणतात ते प्रकल्प जनहितासाठी असणार आहे . अश्या प्रकल्पाचे आम्ही स्वागत करतो , या प्रल्कल्पात एक कला दालन असणार आणि कलाकारांना त्याचा लाभ मिळणार आहे , शिवाय फिल्म सिटी तून स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी मिळेल असा दावा केला.

टाऊन प्लानिंग कमिशन ?

मच्छिंद्र पेडणेकर यांनी दावा करताना विजय सरदेसाई हे मंत्री असताना टाऊन प्लानिंग चे त्यांनी टाऊन कमिशन केले . मध्ये कमिशन घेण्याची प्रथा चालू केले असे सांगितले व बाहेरून ज्या मासे वाहतूक गाड्या यायच्या त्या प्रत्येक वाहनाकडून ते पाच हजार रुपये वसूल कमिशन म्हणून करायचे असा आरोप केल्यावर पत्रकारांनी तुमच्याकडे पुरावे आहेत तर सादर करा , त्यावर ते थोडे गडबडले या विषई विडीवो व्हाईरल झाले , बातम्या प्रसिद्ध झाल्याचा दावा पेडणेकर यांनी केला . पत्रकारांनी पेडणेकर याना विचारले कि तुम्ही विजय मंत्री असताना त्यांच्या विरोधात का बोलत नव्हते असा प्रश्न केला . त्याला ते दावा करतात आम्ही आवाज करत होतो असे

माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकान्त पार्सेकर यांची विजय सरदेसाई यांनी भेट घेणे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित केला असता ,भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी उत्तर देताना ते एक राज्याचे मुख्यमंत्री होते , ते आता माजी मुख्यमंत्री आहेत , जर विजय सरदेसाई यांनी त्यांची भेट का घेतली , याविशई उत्तर देणे आपली पात्रता नाही असे त्यांनी सांगितले . पक्षाचा आदेश मान्य करून आम्ही काम करीत आहोत आम्ही आमच्या विचाराने पक्षाचे काम नव्हे तर वरिष्ठ पक्षाचे जसे काम सांगतात तसे आम्ही करतो असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT