Goa: कवळे मठाधिश शिवानंद सरस्वती स्वामीनी (Shivanand Sarswati Swami) आज गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाचे (Partgalee Jeevottam Math) विद्याधिश स्वामीची (Vidyadhish Swami) भेट घेतली.कवळे मठाचे स्वामीचा चातुर्मास मुंबईत होता.त्यामुळे पर्तगाळी मठाच्या २३ वे स्वामी विद्याधिराज तिर्थ स्वामींच्या महानिर्वाणानंतर ते पर्तगाळ मठात येऊ शकले नाहीत. सद्या त्याचा गोकर्ण( कर्नाटक) येथे धार्मिक कार्यक्रम चालू आहे. तेथूनच त्यांचे संध्याकाळी ४ वाजता पर्तगाळी मठात आगमन झाले.
विद्याधीश स्वामीची भेट घेतल्यानंतर स्वामी समवेत त्यांनी मठ वास्तू जवळून वाहणाऱ्या इशान्य पल्लव कुशावती नदी प्रवाहाला भेट दिली.त्यांनी पुन्हा गोकर्णला प्रस्थान केले.या वेळी पर्तगाळी मठाचे स्थानिक समितीचे सदस्य डॉ.दिनेश पै कवळे मठाचे अनुयायी पूर्णानंद केंक्रे व अन्य मठानुयायी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.