Garlic Price Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Market Price: लसणाचा भडका! गोवेकरांच्या खिशाला कात्री, सिलिंडरनंतर लसूण किंमतीत वाढ

Goa Vegetable Market Price: परवडणार्‍या लसणाची अनुपलब्धता; गोव्याच्या बाजारपेठेत दरवाढ

Ganeshprasad Gogate

Goa Vegetable Market Price: एकीकडे वाढत्या सिलिंडरच्या किमतींमुळे बेजार झालेल्या गोमन्तकीयांना आता भाजीपाल्याच्या चढ्या दराने खिसा रिकामा तयार करायला सुरवात केली आहे. कांदा आणि बटाट्याचे दर सोडल्यास इतर भाज्यांचे दरात प्रमाणात वाढ होत आहे.

घाटमाथ्यावरून तसेच बेळगावातून आवश्यक तितका पुरवठा होत नसल्यामुळे राज्यात सध्या लसूण 400 ते 600 रुपये किलो या दराने विकली जातेय.

फलोत्पादन महामंडळाच्या गाड्यांवर 280 रुपये किलो दराने लसूण मिळत असली तरी पण तेथील माल लवकर संपत असल्यामुळे अनेकांना स्वस्त लसूण मिळणे कठीण होऊन बसलेय. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागतेय.

मागील काही काळापूर्वी बेळगाव आणि लगतच्या परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला होता. त्यात. यात पिकांची बरीच नासाडी झाली होती.

त्यामुळे तेथून पुरेशा प्रमाणात लसूण आणि आले गोव्याला मिळत नसल्यामुळे राज्यात त्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती काही भाजी विक्रेत्यांनी दिली.

इतर भाज्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांचे दर स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

आल्याचा दर प्रतिकिलो 180 ते 200 रुपये झाला आहे. हिरवी मिरची, वालपापडी, भेंडी, तसेच पालेभाज्यांचे दरदेखील वाढत आहेत.

गोव्यात येणारा भाजीपाला हा बेळगाववरून येत असल्याने तेथील भाजी मार्केटमध्ये तुटवडा आल्यास त्याचा फटका गोव्याला बसतो; कारण गोव्यात भाजी आणण्यासाठी लागणारी मजुरी, वाहतूक खर्च यामुळे येथे भाज्यांचे दर वाढवावे लागतात.

दरम्यान काल बुधवारी भाजपचे डबल इंजिन सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्यात पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप महिला काँग्रेसने केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार यांची अयशस्वी धोरणे लोकांना पुन्हा चुली पेटवण्यास भाग पाडत आहे, असा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी पणजीत काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT