Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: संपकरी 130 कामगारांना ‘गोवा फॉरवर्ड’चा पाठिंबा

Goa News: उद्योग कंपन्या सहसा वापरा आणि फेकून द्या, धोरण अवलंबतात.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा फॉरवर्ड पक्षाने बुधवारी वेर्णा येथे संप करणाऱ्या कंपनीच्या 130 कामगारांना पाठिंबा दिला. पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदास लोलयेकर, उपाध्यक्ष दुर्गादास कामत, दिलीप प्रभुदेसाई आणि प्रशांत नाईक यांच्यासह शिष्टमंडळाने कामगारांची भेट घेऊन संपाच्या कारणांवर चर्चा केली.

प्रशांत नाईक यांनी सांगितले की, चुकीच्या कृतींविरुद्ध आवाज उठवणे आणि नोकरी गमावलेल्यांना मदत करणे हे गोवा फॉरवर्डचे कर्तव्य आहे. उद्योग कंपन्या सहसा वापरा आणि फेकून द्या, धोरण अवलंबतात.

या 130 कामगारांवर अन्याय झाला आहे, कारण रोजगार पत्रिका दर्शवते की ते आधीच कामावर आहेत. त्यामुळे त्यांना इतरत्र नोकरी मिळणार नाही. त्यामुळ कंपनीने गमंतकीय युवकांच्या नोकऱ्या आणि त्यांचे भवितव्य हिरावून घेऊ नये.

आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असून हा प्रश्न कामगार आयुक्त आणि शासनाकडेही नेणार आहोत, असेही नाईक म्हणाले. दुर्गादास कामत म्हणाले की, हे गोव्यातील तरुण आहेत, ज्यांना काढून टाकण्यात आले आहे.

पण त्याच कंपनीने कोल्हापुरात मुलाखती घेऊन इतर राज्यांतून आणखी 50 लोकांना नेले आहे. याचा अर्थ कंपनी चांगले काम करत आहे, परंतु गोव्यातील कामगारांना का पक्के करायचे नाही, याचे कारण त्यांना द्यावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT