Crime  Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime Case: महत्वाची अपडेट! वास्को कामगार खून प्रकरणात साक्षीदाराने जबाब फिरविला

Vasco Crime Case: संशयिताची दक्षिण गोवा अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाकडून खुनाच्या आरोपातून सुटका

सुशांत कुंकळयेकर

Vasco Crime Case: किरकोळ वादानंतर रागाच्या भरात लाकडी दंडुक्याने मारहाण केल्यामुळे वास्‍को येथे रमेश चौहान या कामगाराचा खून झाला होता.

मात्र या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने आपला जबाब फिरविल्यामुळे न्यायालयाने संशयित पृथ्वी नंदलाल चौहान याची निर्दोष सुटका केली.

याबाबतचा निवाडा काल मडगाव येथील दक्षिण गोवा व सत्र न्यायालयाचे न्या. शमा जोशी यांनी दिला. लाकडी दंडुक्यावर सापडलेले रक्तगट संशयिताचे नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने या निवाड्यात नोंदविले आहे.

संशयिताची बाजू मांडणारे अॅड. अमेय प्रभुदेसाई यांनी तक्रारदार प्रथमदर्शनी साक्षीदार नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच सदर दंडुका संशयिताकडून जप्त करण्यात आला नाही.

याशिवाय दंडुक्यावर संशयिताच्या रक्ताचे नमुने सापडले नसल्याचा युक्तिवाद करून संशयिताची निर्दोष सुटका करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी न्यायालयात मारहाण वेळी उपस्थित असलेल्या प्रथमदर्शनी साक्षीदारांनी साक्ष फिरवली. या सर्व युक्तिवादाची दखल घेऊन न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयित पृथ्वी चौहान याची निर्दोष सुटका केली.

वास्को पोलिसांनी 27 मे 2022 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, वास्को येथील अन्नपूर्णा रेस्टॉरंटजवळ एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना 27 मे रोजी सकाळी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला होता.

याच दरम्यान पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असता, मृतदेह रमेश चौहान याचा असल्याचे समजले. तो मूळचा ठाणे (महाराष्ट्र) येथील असून रमेश कधी भीक तर कधी मजुरी करून उदारनिर्वाह करत असल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार, पोलीस निरीक्षक कपिल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याच दिवशी पहाटे साडेपाचच्या सुमारास रमेश आणि संशयित पृथ्वी चौहान यांच्यात सिडिकेट बँकेजवळ असलेल्या बार परिसरात काही कारणावरून किरकोळ वाद झाला.

रागाच्या भरात संशयित पृथ्वी याने लाकडी दंडुक्याने रमेशला मारहाण केल्यामुळे रमेश गंभीर जखमी होऊन तेथेच पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वास्को पोलिसांनी संशयित पृथ्वीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

याच दरम्यान रमेश याला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले. याची दखल घेऊन पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून पृथ्वी चौहान याला अटक केली.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पृथ्वी चौहान याच्या विरोधात वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात 25 जुलै 2022 रोजी आरोपपत्र दाखल केले.

खून प्रकरण सत्र न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे 7 सप्टेंबर 2022 रोजी मडगाव येथील दक्षिण गोवा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. या प्रकरणी सत्र न्यायालयाने 1 आॅक्टोबर 2022 रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला होता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

SCROLL FOR NEXT