Cylinder Blast Dainik Gomantak
गोवा

Cylinder Blast: न्यू वाडे येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट; सासू-सुनेचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Cylinder Blast या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या शिवानी ह्या गर्भवती असल्याचीही माहिती मिळतेय.

Ganeshprasad Gogate

Cylinder Blast: काही दिवसांपूर्वी कारेमड्डी कुडचडे येथील जामा मशिदजवळील एका घरात सिलिंडरचा स्फोट होऊन किचन पूर्णपणे जळाल्याची घटना ताजी असताना अशाच प्रकारची दुसरी घटना वास्को येथे घडलीय.

शनिवारी सकाळी वास्को येथील न्यू वाडे येथे सिलिंडर लिकेज झाल्यामुळे स्फोट झाला असून या घटनेत शिवानी राजावत (२६) आणि त्यांच्या सासू जयदेवी यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या शिवानी ह्या गर्भवती असल्याचीही माहिती मिळतेय.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. राजावत कुटुंबीय न्यू वाडे येथील राष्ट्रोळी जय संतोषी माता मंदिराशेजारी भाड्याच्या जागेत राहत होते. या घटनेवेळी त्या दोघींशिवाय घरात अन्य कुणीही सदस्य नसल्याचेही समजतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT