Goa Sex Racket Bust Dainik Gomantak
गोवा

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Sex Racket Bust: वास्को पोलिसांनी दाबोळी येथील 'लोटस स्पा' नावाच्या मसाज पार्लरवर छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

Manish Jadhav

Sex Racket Bust: वास्को पोलिसांनी दाबोळी येथील 'लोटस स्पा' नावाच्या मसाज पार्लरवर छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली असून या रॅकेटचे संचालन करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'लोटस स्पा' या नावाने चालणाऱ्या या मसाज पार्लरमध्ये अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय आणि ठोस माहिती वास्को पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने सापळा रचून ही कारवाई केली.

पोलिसांनी स्पा सेंटरवर वेळीच छापेमारी करुन सहा महिलांची सुटका केली. या अनैतिक रॅकेटचे संचालन करणारे आणि महिलांना (Womens) यात ढकलणारे दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. नागेश कुमार आणि भिमसिंग कबीर नाईक अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी स्पाच्या नावाखाली हा संपूर्ण अवैध धंदा चालवत होते.

गुन्हा नोंद आणि पुढील तपास

वास्को (Vasco) पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 143 आणि 144, तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (ITP Act) कलम 3, 4, आणि 5 अशा विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सध्या अटक केलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीतून या रॅकेटचे नेटवर्क किती मोठे आहे, यात आणखी कोण सहभागी आहे, आणि सुटका करण्यात आलेल्या महिलांची या व्यवसायात कशी फसवणूक झाली, अशा अनेक महत्त्वाच्या बाबींचा तपास पोलिस करत आहेत. वास्को पोलिसांनी केलेली ही जलद आणि प्रभावी कारवाई गोव्यातील पर्यटन क्षेत्राच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक व्यवसायाला मोठा दणका देणारी ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानच्या स्टार खेळाडूला अटक, फार्म हाऊसमध्ये मोलकरणीवर केला अत्याचार

Margao: मडगाव पालिकेच्या 'तिठ्या'वरच जुगाराचा अड्डा; सायंकाळ झाली की 'गडगडा' सुरू! प्रशासनाची डोळेझाक

Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

SCROLL FOR NEXT