Fr Bolmax Pereira apologized  Dainik Gomantak
गोवा

Fr Bolmax Pereira : फादर परेराविरोधात अखेर गुन्‍हा दाखल

शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य : वास्को पोलिस ठाण्यासमोर शिवप्रेमींची निदर्शने

गोमन्तक डिजिटल टीम

Fr Bolmax Pereira छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी फादर बोलमॅक्स परेरा यांच्‍या विरोधात अखेर शुक्रवारी रात्री वास्‍को पोलिस ठाण्‍यात कलम २९५, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

शेकडो शिवप्रेमी व राज्‍यभरातील हिंदू संघटना सदस्‍यांनी वास्‍को पोलिस ठाण्‍याबाहेर अटकेच्‍या कारवाईसाठी जोरदार निदर्शने केली. त्‍यामुळे शहरात तणावाचे वातावरण होते.

चिखली येथील फादर परेरा यांनी शेर्मावात छत्रपती शिवरायांचा नामोल्‍लेख करून आपली मते मांडली होती. त्‍याचा व्‍हिडिओ सर्वत्र ‘व्‍हायरल’ झाला होता. फादर परेरा यांचे वक्‍तव्‍य छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे आहे, असा दावा करून वास्‍कोसह काणकोण, फोंडा पोलिस ठाण्‍यात काल फादर परेरा विरोधात तक्रारी करण्‍यात आल्‍या होत्‍या.

शिवप्रेमींची भूमिका

ख्रिश्चन धर्मगुरू फादर बोलमॅक्स परेरा हे नेहमीच वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये करतात. ती हिंदूविरोधी असतात. आताही ते शिवरायांविरोधात बोलले आहेत. त्‍यांच्‍या अटकेसाठी आम्‍ही निदर्शने करत आहोत.

माझ्‍या वक्‍तव्‍याचा विपर्यास केला गेला. त्‍यामुळे जर कुणाच्‍या भावना दुखावल्‍या असतील तर मी दिलगिरी व्‍यक्‍त करतो. - फादर बोलमॅक्स परेरा

धार्मिक सलोखा प्रत्‍येकाने जपावा. छत्रपती शिवरायांप्रति विधानावरून दाखल तक्रारीवर पोलिस योग्‍य ती भूमिका घेतील. कायदा सुव्‍यवस्‍थेला बाधा पोहोचू देणार नाही. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT