Vasco Accident| Goa News  Dainik Gmantak
गोवा

Vasco Accident News: चुकीच्या बाजूने बेदकारपणे गाडी चालवून एका महिलेचा मृत्यू

Vasco Accident News: ‘तो’ अल्पवयीन वाहनचालक ‘अपना घरा’त

दैनिक गोमन्तक

Vasco Accident: दाबोळी - चिखली सेंट अँथनी नीव चॅपेलजवळ अपघातास कारणीभूत ठरलेल्या साळगाव - बार्देश येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला वास्को पोलिसांनी वाहन कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवून त्याची मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये रवानगी करण्यात आली आहे.

वाहन चालविण्याचा परवाना नसताना चुकीच्या बाजूने बेदकारपणे गाडी चालवून शुक्रवारी (ता. 25) दुपारी पावणे दोनच्या सुमारास दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात चिखली येथे राहणारी रीना गोन्साल्वीस (फर्नांडिस) हिचा मृत्यू झाला होता, तर तिच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेला तिचा पुतण्या गंभीर जखमी झाला होता.

त्याला तातडीने चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात हलविण्यात आले. आज सकाळी त्याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

43 वर्षीय रीना गोन्साल्वीस यांचा ज्या अपघातात मृत्यू झाला, त्या कारचा चालक अल्पवयीन होता आणि त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, अशी माहिती वास्को पोलिसांनी दिली.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा दुचाकीला धडक दिलेल्या कारमध्ये 4 प्रवासी होते. त्यात 2 मुले (ड्रायव्हरसह) आणि 2 मुली होत्या. त्यापैकी एक 18 वर्षांची मुलगी वास्को येथील असून उर्वरित 3 मुले बारावीत शिकणारी म्हापशातील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi New Fare Rates: गोव्यात टॅक्सी प्रवासाचे नवे दर लवकरच लागू! पहिल्या 3 किमीला 300, 3 ते 8 किमीला 445 रुपये

Marathi Language Status: 'सहभाषेचा दर्जा, मग मराठीला न्याय कुठेय?' वेलिंगकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; सावंतांची भूमिका दिशाभूल करणारी असल्याचा आरोप

Hamza Bin Laden: ओसामा बिन लादेनचा मुलगा 'हमजा' जिवंत? अल-कायदाच्या 50 मिनिटांच्या व्हिडिओनं खळबळ; जागतिक गुप्तचर संस्था सतर्क VIDEO

Goa Politics: 'मगो पक्षाने राजकीय मर्यादा ओळखाव्यात!' CM सावंतांचा मित्रपक्षाला सूचक टोला; मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यास स्पष्ट नकार

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्ग खुला; स्वातंत्र्यसैनिक दाद देसाई भारावले, दिगंबर कामतांसोबत केली पहिली सवारी

SCROLL FOR NEXT