Guidance in School Group Children's Anand campingn Dainik Gomantak
गोवा

विद्यार्थ्यांना उपक्रमांतून मिळते संधी : गोविंद तारी

गोविंद तारी : शेळप खुर्द शाळा समुहाच्या बाल आनंद मेळाव्यात मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई : विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणामध्ये आनंद निर्माण करण्याची प्रक्रिया सातत्याने होणे गरजेचे असते. यातून ते चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतात. यामुळे अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करा, असे आवाहन सरकारी माध्यमिक विद्यालय भुईपालचे कलाशिक्षक गोविंद तारी यांनी पालक, शिक्षकांना केले.

सरकारी माध्यमिक विद्यालय शेळप खुर्द येथे शनिवारी आयोजित बाल आनंद मेळाव्याच्या उद्‍घाटन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापिका रंजीता प्रभू, शारीरिक शिक्षक प्रजय गावस, शिक्षिका प्रकृती तारी, शिक्षक यशवंत गावकर उपस्थित होते. मेळाव्यात इंग्रजी, मराठी व्याकरण, हस्ताक्षर, वाचन कौशल्य, कराटे प्रात्यक्षिक या संबंधित विविध कृती घेण्यात आल्या. सूत्रसंचालन प्रकृती तारी, यशवंत गावकर यांनी आभार मानले.

६७ मुलांचा सहभाग

मुख्याध्यापिका प्रभू म्हणाल्या, की मेळाव्यात प्राथमिक शाळेतील ६७ मुलांनी भाग घेतला असून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अविस्मरणीय असेल. भविष्यात माध्यमिक व प्राथमिक स्तरावरील शिक्षणाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT