Gaur  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: मासोर्डेत गव्यांचा धुमाकूळ; भाजीपाला पिकांसह बागायतीची नासधूस

Valpoi News: रात्रौ. 10.30च्या सुमारास गव्या रेड्यांच्या कळपाने गावस यांच्या भाजी पीक लागवडीत घुसून भाजी उत्पादनाची नासधूस केली.

Ganeshprasad Gogate

Valpoi News: वाळपई नगरपालिका क्षेत्रातील मासोर्डे गावात काल बुधवारी रात्री गव्या रेड्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या पिकाची अक्षरश: नासधूस करत हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

मासोर्डे येथील सुगडो गावस यांनी आपल्या शेतीत मिरची, वाली, भेंडी, चिटकी, टोमेटो, लालभाजी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली होती.

पीक अगदी बहरलेले होते. पण काल रात्रौ. 10.30च्या सुमारास गव्या रेड्यांच्या कळपाने गावस यांच्या भाजी पीक लागवडीत घुसून भाजी उत्पादनाची नासधूस केली.

मासोर्डे गाव हे शहराजवळ असून या गावापर्यंत गवे येऊ लागल्याने गावातील स्थानिकांमध्ये घाबरत पसरली आहे. त्यांना हुसकावून लावताना हे गवे आक्रमक बनत असल्याने स्थानिकांच्या जीवाला धोका असल्याचे बोलले जातेय.

या प्रकारांमुळे गावस यांना आर्थिक फटका बसलेला आहे तसेच कुटुंबासाठी या भाजी पिकाचे उत्पादन घेतले असल्याने कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा घास हिरवल्याचे ते म्हणाले.

बागायती पीकाबरोबरच आता कमी कालावधीत उत्पादन मिळत असलेली भाजी पीकेदेखील गव्यारेड्यांनी टार्गेट केलेली आहेत.

याच संदर्भात सुगडो गावस म्हणाले आपण कटुंबियांच्या मदतीने घरगुती भाजी पीक घेत असून गावठी पध्दतीने घेतलेले उत्पादन चांगले चविष्ट आणि रासायनिक खत विरहित असल्याने पोषक असते. पण गव्या रेड्यांच्या हैदोसामुळे लोक हैराण झाले असून नागरिक आता हतबल होत चालले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'अशी मीटिंग झालीच नाही'! तवडकरांच्या विषयावरून प्रदेशाध्‍यक्षांचे कानावर हात; भाजप नेत्यांची सावध प्रतिक्रिया

Goa SAG: ‘साग’मधील जंगी स्‍वागतामुळे संचालक गावडे वादात, कारणे दाखवा नोटिस; गावडे - तवडकर वादाची चर्चा

Rashi Bhavishya 16 September 2025: र्थिक ताण जाणवू शकतो, रोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी; मित्रांकडून मदत

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

SCROLL FOR NEXT