Goa Beach Shack Dainik Gomantak
गोवा

Vagator Beach Shacks: पुन्हा शॅकमध्ये मारहाणाची घटना; वागातोर येथील कर्मचाऱ्यांच्या भांडणाचा Video Viral

Goa Beach Shack Fight: किनाऱ्यावर शॅक कामगारांमध्ये झालेल्या वादावादीमुळे पर्यटकांची शांतता भंग झाली

Akshata Chhatre

Vagator Beach Fight Viral Video

म्हापसा: गोव्यात पर्यटनावरून बराच मोठा वादंग उठलाय. यामध्ये सध्या शॅक्सवरून मतमतांतरं पहायला मिळतायत. यंदाच्या पर्यटन हंगामात अनेकवेळा मारामारीचे प्रसंग देखील घडलेत आणि शुक्रवारी (१० जानेवारी) रात्री पुन्हा एकदा वागातोरच्या किनाऱ्यावर शॅक कामगारांमध्ये झालेल्या वादावादीमुळे पर्यटकांची शांतता भंग झाली. मारामारीच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जातोय.

उत्तर गोव्यातील हणजूण आणि वागातोर समुद्रकिनाऱ्याच्या मध्ये एक छोटासा समुद्रकिनारा आहे तो म्हणजे ओझरण समुद्रकिनारा. शुक्रवारी रात्री या किनाऱ्यावरील शॅक्समधल्या कामगारांमध्ये काही विषयावरून वाद झाला आणि प्रकरण वाढल्याने ते हाणामारीवर उतरले. शॅकमधील कामगारांमध्ये झालेल्या भांडणामुळे, पर्यटकांसाठी अडथळा निर्माण केला आणि शेजारच्या आस्थापनांचे लक्षणीय नुकसान झाल्यामुळे बराच गोंधळ उडाला.

या वादावादीचे प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांवर वाळू फेकली जी शॅकमध्ये जेवायला आलेल्या पर्यटकांच्या अन्नात मिसळली, यामुळे पर्यटकांचे अन्न आणि पेय दूषित झाले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत असल्याने पुन्हा एकदा शॅक्समधील मारामारीच्या प्रकरणांवर चर्चा सुरु झाली आहे.

कळंगुटमध्ये शॅकवाल्यांना दादागिरी भोवली

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच कळंगुट येथून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. कळंगुट येथे पर्यटकांना निशाणा बनवण्यात आले होते. ये प्लॅनेट गोवा शॅकवर मुंबईहून आलेल्या पर्यटक आणि शॅक कामगार यांच्यात शुक्रवारी (३ जानेवारी) पहाटे ३ वाजता झालेल्या वादावादीत एक पर्यटक गंभीर जखमी झाला होता

या प्रकरणात स्थानिक पंच सदस्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांना म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

SCROLL FOR NEXT