Goa Vaccination: State will complete full vaccination doses says health minister Vishwajeet Rane  Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: राज्यात लवकरच 100 टक्‍के लसीकरण पूर्ण होणार,आरोग्य मंत्र्यांचे प्रतिपादन

गोव्यातील लोकांचे दोन्ही डोसांचे लसीकरण (Goa Vaccination) येत्या महिन्या-दीड महिन्यात पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी आज केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात (Goa) कोरोना (COVID-19) नियंत्रणात येत आहे. पर्यटकांनी (Goa Tourism) कोरोना नियमांचे पालन करून व दोन्ही लसी घेऊनच गोव्यात यावे(Goa Vaccination). गोव्यातील लोकांचे दोन्ही डोसांचे लसीकरण येत्या महिन्या-दीड महिन्यात पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे (Health Minister Vishwajeet Rane) यांनी आज केले.(Goa Vaccination: State will complete full vaccination doses says health minister Vishwajeet Rane)

भारतीय फार्मास्‍युटिकल संघटनेच्या (आयपीए) गोवा शाखेतर्फे अन्न व औषधे प्रशासनालय गोवा (एफडीए) व फार्मसी महाविद्यालय पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे आयोजित जागतिक फार्मसी दिन सोहळ्यात आरोग्य मंत्री राणे बोलत होते. यावेळी ‘एफडीए’च्या संचालक ज्योती सरदेसाई, तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक विवेक कामत, फार्मास्‍युटिकल संघटनेचे

अध्यक्ष डॉ. प्रवीण कुल्लर, ‘आयपीए गोवा’चे अध्यक्ष डॉ. गोपाळ कृष्ण राव व सचिव प्रसाद तांबा व्यासपीठावर उपस्थित होते.

मोफत आरोग्य उपचार करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. गोव्यात दिल्लीपेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा आहेत. त्यामुळे दिल्लीतील नेत्यांनी गोव्यात येऊन बढाया मारू नयेत, असा टोलाही मंत्री राणे यांनी लगावला.कोविड नियंत्रणात फार्मासिस्ट व फार्मास्‍युटिकल कंपन्‍यांची महत्त्‍वाची भूमिका आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळेच कोरोनावर नियंत्रण आल्याचे राणे म्हणाले.

औषधांच्या किमती आटोक्यात राहाव्यात यासाठी ‘एपीपीए दिल्ली’ ‘एफडीए’च्या सतत संपर्कात राहात असून, सेवाभावनेतून हे कार्य चालल्याचे प्रतिपादन व्हर्चुअल माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले ‘एनपीपीए’चे सदस्य सचिव डॉ. विनोद कोतवाल यांनी केले.

इतर मान्‍यवरांनीही विचार व्‍यक्‍त केले. कोविड काळात चांगले कार्य केल्याबद्दल ‘एफडीए’च्या संचालक ज्योती सरदेसाई, उपसंचालक मेघा सिनाई देसाई, तसेच हेलन डिसा, नीलिमा मिशाळ, डॉ. राजेश परब, डॉ. राजश्री गुडे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. लविना डिकॉस्टा, आर्या चिमुलकर, प्रचिता गावस देसाई, आल्वीया रॉड्रिग्ज, रुतिका नाईक आदी फार्मसीच्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. स्वागत डॉ. राव यांनी केले. आभार प्रसाद तांबा यांनी मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT