वास्कोत मुख्य सरकारी शाळेत विशेष टीकाकरण मोहीमे अंतर्गत लसीकरणासाठी आलेले नागरिक. Dainik Gomantak
गोवा

Goa vaccination : वास्कोत मोफत लसीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वांना मोफत वॅक्सिन (Vaccine) देणार असल्याची घोषणा दिल्याने देशात मोफत वॅक्सिन मोहीम (Vaccine campaign) यशस्वीरित्या सुरु आहे

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वांना मोफत वॅक्सिन (Vaccine) देणार असल्याची घोषणा दिल्याने देशात मोफत वॅक्सिन मोहीम (Vaccine campaign) यशस्वीरित्या सुरु आहे. गोव्यात सर्वांना वॅक्सिन देण्याच्या मोहिमेत आज शनिवार (दि.17) ज्यांच्याजवळ ओळखपत्र (Identity Card) नाही व इतर राष्ट्रातील नागरिक व बेघर असलेल्यांना वास्कोत मुरगाव तालुका उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वॅक्सिन (Free vaccine) देण्यात आले. या मोहिमेत (Campaign)एकूण 181 जणांनी ओळखपत्र नसलेल्यांनी लस घेतली. पैकी 115 जण नेपाली नागरिक होते.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत विशेष टीका करण मोहीम मुरगाव तालुका उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस व मुरगावचे मामलेदार धीरेन बाणावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को येथील मुख्य सरकारी शाळेत राबविण्यात आली. यात ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही, इतर राष्ट्रातील नागरिक व बेघर असलेल्यांना मोफत वॅक्सिन देण्यात आले. मुरगाव, वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी भागात राहणाऱ्या ज्याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र नाही, नेपाली किंवा इतर राष्ट्राचे नागरिक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेघर असलेल्यांना मोफत वॅक्सिन देऊन त्यांची रवानगी वेर्णा येथे निवारा शेड मध्ये करण्यात आली. राज्य आरोग्य संचालनालयानचे डॉ.समिर नाईक यांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात आले.

मुरगाव उपजिल्हाधिकारी गावस यांच्या अध्यक्षतेखाली मामलेदार धीरेन बाणावलीकर व इतर अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात वास्को, मुरगाव,दाबोळी व कुठ्ठाळी येथे ओळखपत्र नसलेले नागरिक, नेपाली, बेघरांची नोंदी केली. त्यानुसार शनिवारी सकाळपासून सरकारी शाळेत सर्वांना वॅक्सिन देण्यात आले. तसेच काही बेघर असलेल्यांना निवारा शेड मध्ये पाठवण्यात आले.यावेळी टीकाकरण केलेल्यांना औषध व जेवणाची सोय करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT