Protest Dainik Gomantak 
गोवा

Goa Updates: 'सरकारने एवढेदेखील कठोर होऊ नये'

मानसोपचार व मानवी वर्तन संस्थेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी: मार्च महिन्यातील पगार आम्हाला अजून मिळालेला नाही. परिस्थिती बिकट झाल्याने कुटुबींयांचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होत आहे. सरकारने आमच्यावर एवढे देखील कठोर होऊ नये. आमची कुटुंबे आमच्या मिळकतीवर अवलंबून आहेत. सरकारने आम्हाला कामावर रूजू करून घ्यावे अशी मागणी मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली.

संस्थेचे कंत्राटी कर्मचारी 14 एप्रिलपासून सरकारने कामावर रूजू करून घ्यावे यासाठी धरणे आंदोलन करत आहेत. मात्र, अजून त्यांना न्याय मिळालेला नाही. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. महादेव परब, काशिनाथ परब, श्रीकांत गोवेकर, भगवान केरकर, सिद्धेश साळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘गेली नऊ वर्षे काम करून हा असा अन्याय आमच्यावर करू नये. आम्ही मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री विरोधीपक्ष नेते सर्वांना निवेदन दिलेले आहे. मात्र, आम्हाला भेटीसाठी बोलावलेले नाही.

न्यायालयाच्या निकालापूर्वीच आम्हाला कामावरून काढले. कोविड महामारीच्या दरम्यान आम्ही काम केले. ज्यावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो त्यावेळी त्यांनी तुमचे कंत्राट नुतनीकरण करतो म्हणून सांगितले होते मात्र त्यावर अजून काही निर्णयच झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT