Goa University PG admission 2026-27 Dainik Gomantak
गोवा

गोवा विद्यापीठ पदव्युत्तर, बी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरू; 18 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Goa University PG admission 2026-27: गोवा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पद्युत्तर पदवी आणि बी.एड. अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पद्युत्तर पदवी आणि बी.एड. अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. प्रवेशासाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रिया, चाचणी व इतर संदर्भातील सविस्तर अधिसूचना विद्यापीठाने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार गोवा विद्यापीठातील पद्युत्तर पदवी (मास्टर) आणि बी.एडसाठी १८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे.

त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपले निवडलेले विषय बदलायचे असतील तर ते २५ आणि २६ फेब्रुवारीपर्यंत बदलता येणार आहे. प्रवेश चाचणी परीक्षा फेरी क्रमांक १ ही ७, ८, १४, १५ आणि २२ मार्च २०२६ या दरम्यान होणार आहे. गोवा विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील पदव्युत्तर तसेच बी.एड अभ्यासक्रमांसाठी प्रवेश हा चाचणीतील गुणांवर आधारित राहील.

तसेच बी.एडसाठी उच्च शिक्षण संचालनालयाने ठरविलेल्या इतर पात्रता निकषांची अट लागू असेल. मात्र, काही अभ्यासक्रमांना पात्रता चाचणी परीक्षा लागू राहणार नाही. सविस्तर माहिती, अभ्यासक्रमासाठीच्या एकूण जागा, आरक्षण व इतर तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT