university seat allocation Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचा कोटा वाढला; स्थानिकांच्या जागा धोक्यात?

Goa Univeristy Admissions: गोवा विद्यापीठाने यंदाच्या वर्षी विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश वाढवण्याचा विचार केला आहे

Akshata Chhatre

पणजी: गोवा विद्यापीठात अनेक विदेशी विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेतात, मात्र या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने घेतलेला निर्णय विद्यापीठाची डोकेदुखी वाढवू शकतो. अलीकडेच पेपर फोडीच्या प्रकरणामुळे विद्यापीठाला मोठं नुकसान शान करावं लागलं होतं. गोवा विद्यापीठाने यंदाच्या वर्षी होणाऱ्या प्रवाशांमध्ये विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश वाढवण्याचा विचार केला आहे आणि हा कोटा दुप्पट होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या या निर्णयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होईल अशा चर्चा केल्या जातायत, या निर्णयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागा कमी होऊ शकतात. यापूर्वी गोवा विद्यापीठामध्ये बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा जागांपैकी दोन जागांवर आरक्षण देण्यात येत होते, मात्र आता यात बदल करण्यात आला असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जागा कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी विद्यापीठात ऐकूण ११८१ जागांपैकी ६८ जागा बाहेरील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या, मात्र यंदाच्यावर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकूण ११३३ जागा आहेत आणि यातील ११२ जागा बाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात.

विद्यापीठासोबत संलग्न असणाऱ्या महाविद्यालयात गेल्या वर्षी एकूण १०९४ जागा होत्या पैकी बाहेरील विद्यार्थ्यांसाठी ५४ जागा देण्यात आल्या होत्या, ज्या यंदाच्या वर्षी १०४६ करण्यात आल्या असून यांपैकी १०५ जागा राखीव ठेवल्या जातील आणि बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ ते १० जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. गोवा विद्यापीठात कमी खर्चात अभ्यासक्रम पूर्ण होत असल्याने विद्यार्थी त्याला प्राध्यान देतात मात्र जागा न मिळाल्यास आता विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांचा विचार करावा लागू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale jail: 'कारागृह', सुधारगृह की पंचतारांकित हाॅटेल? भिंतीआड सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कठोर कारवाईची गरज

Karnataka High Court: 'आई-वडिलांची सेवा करणं मुलगा-मुलीची जबाबदारी, जावई-सुनेची नाही', पत्नीच्या स्वातंत्र्यावर हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Goa Education: क्रमवारी वाढली, आता गुणवत्ता उंचावू दे! शिक्षणात गोव्याची पायाभूत कामगिरी भक्कम

Job Opportunities: 'नोकरी देता का नोकरी?' गोव्यातील उच्चशिक्षित तरुणाईची व्यथा; ॲप्रेंटिसशीपच्या आश्वासनांपासून बेरोजगारीच्या नैराश्यापर्यंतचा प्रवास

Kanpur Plane Crash: कानपूरमध्ये मोठी विमान दुर्घटना! पायलट अन् सह-पायलटचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ VIDEO

SCROLL FOR NEXT