Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: दर्जेदार शिक्षणासाठी गोवा विद्यापीठाचं मोठं पाऊल, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी केला करार

गोवा विद्यापीठाने सागरी क्षेत्रातील सहकार्यासाठी बांगलादेशातील एका विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

(Goa University) गोवा विद्यापीठाने नुकतंच गोमंतकीय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. गोवा विद्यापीठाने सागरी क्षेत्रातील सहकार्यासाठी बांगलादेशातील एका विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे. अशा करार करणारं गोवा विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरलं आहे, अशी माहिती गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन यांनी दिली आहे.

बांगलादेशातील बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान मेरीटाईम युनिव्हर्सिटीसोबत गोवा विद्यापीठाने सागरी क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे. हरिलाल मेनन हे 'हवामान बदलाचे संकट' या आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभागी होण्यासाठी नुकतेच बांगलादेशात गेले होते. याचवेळी या करारावर दोन्ही विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रीय समुद्रीशास्त्र संस्थेचे डॉ. नरसिंह ठाकूर हे 'बायो प्रॉस्पेक्टिंगसहीत मरीन केमिकल इकोलॉजी' (Marine Chemical Ecology with Bio Prospecting) या विषयावर बोलण्यासाठी या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते.

या आठवड्यात गोवा विद्यापीठाने फ्रेंच संस्थांशी सहकार्य करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी, भारतातील फ्रेंच दूतावासातील शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीचे संचालक इमॅनुअल लेब्राऊन डेमिनीस यांनी गोवा विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यापीठाचे कुलगुरु मेनन यांची भेट घेऊन फ्रान्समधील उच्च शिक्षणाबाबत चर्चा केली. गोवा विद्यापीठाने केलेल्या या करारांमुळे गोव्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT