Goa Underground Power Cable Work Dainik Gomantak
गोवा

Bad Roads In Goa: गोव्यात भूमिगत वीजवाहिनीमुळे रस्त्यांची दुरवस्था; वेळेत पुनर्बांधणीसाठी वीजमंत्र्यांचे आदेश

Goa Underground Power Cable Work: गोव्यात सध्या भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे मोठे काम सुरू असून, यामुळे अनेक रस्ते खराब होत आहेत. मात्र, या रस्त्यांची पुनर्बांधणी वेळेत केली जावी.

गोमन्तक डिजिटल टीम

goa underground power lines road repair power minister sudin dhavalikar directive

पणजी: गोव्यात सध्या भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे मोठे काम सुरू असून, यामुळे अनेक रस्ते खराब होत आहेत. मात्र, या रस्त्यांची पुनर्बांधणी वेळेत केली जावी, यासाठी स्थानिक पंचायतींनी ते काम योग्य वेळी झाले नाही तर वीज आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्राद्वारे सूचित करावे, अशी सूचना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. तसेच, या पत्राची प्रत मला देण्यात यावी, जेणेकरून स्वतः लक्ष घालून ते काम करून घेऊ शकेन, असेही त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंगळवारी ते त्यांच्या कक्षाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. गोव्यात (Goa) सध्या ३३ केव्ही वीजवाहिनी भूमिगत टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. राज्यभर विविध भागांत टप्प्याटप्प्याने ही कामे सुरू आहेत. सध्या फक्त एसटी (सप्लाय ट्रान्समिशन) लाईन भूमिगत केली जात आहे, तर एलटी (लो टेन्शन) लाईन काही ठिकाणी, विशेषतः महत्त्वाच्या नगरपालिका आणि शहरी भागांत भूमिगत करण्याचे काम लवकरच सुरू होईल, असे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

भूमिगत वीजवाहिनी टाकताना रस्ते खणले जात असल्याने नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, ही कामे दीर्घकालीन लाभाची आहेत, असे सांगत ढवळीकर यांनी लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.

२०२७-२८ पर्यंत टप्प्याटप्प्याने काम पूर्ण होणार!

गोव्यात हे मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून, ते २०२७-२८ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वीजमंत्र्यांनी केले. त्यांनी नमूद केले की, कामाच्या प्रत्येक टप्प्यात सरकार आणि संबंधित विभाग नागरिकांच्या (Citizens) अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT