Goa Turtle Conservation Dainik Gomantak
गोवा

Goa Turtle Conservation: कासवांचे संवर्धनही हवे, पर्यटनावर परिणामही नको; रोहन खंवटेंची संतुलित भूमिकेची अपेक्षा

Turtle Nesting Beaches Goa: गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे मोठे योगदान असून, हजारो नागरिकांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

राज्‍यातील समुद्रकिनाऱ्यांवर कासवांच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेचे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करतानाच पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. कासव संवर्धन आणि पर्यटन या दोन्ही गोष्टी एकत्र सुरू राहू शकतात. त्यासाठी संतुलित आणि शाश्वत दृष्टिकोन ठेवण्याची गरज असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.

गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे मोठे योगदान असून, हजारो नागरिकांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे. समुद्रकिनारे हे पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असल्याने पर्यटन उपक्रमांवर निर्बंध घालताना स्थानिक व्यावसायिक आणि रोजगारावर होणारा परिणामही विचारात घ्यावा, असे खंवटे यांनी नमूद केले.

कासवांच्या अंडी घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांची अधिसूचना वन खात्याने जारी केली आहे. कासवांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणासाठी हा निर्णय महत्त्वाचा असला, तरी वन आणि पर्यटन खात्यांत योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. दोन्ही खात्यांनी थेट चर्चा करून सामंजस्याने मार्ग काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

कासव संवर्धन आणि पर्यटन क्षेत्रातील संबंधित घटकांशी चर्चा करून योग्य ठिकाणे निश्चित करावीत. ज्या भागांत कासवांचे प्रभावी संवर्धन शक्य आहे, तेथे योग्य नियोजन केल्यास पर्यटन उपक्रमांवर अनावश्यक निर्बंध टाळता येतील, असेही खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! ECG सामान्य असूनही येऊ शकतो हार्ट अटॅक, छातीत दुखत असल्यास अजिबात दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा

Calangute Parking Charges: कळंगुटमध्ये जादा पार्किंग शुल्क आकारणे भोवले; कंत्राटदाराला नोटीस, कंत्राट रद्द होणार

IND vs NZ 1st Test: वेलिंग्टनमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांचा जलवा! न्यूझीलंडविरुद्ध 12 वर्षांनंतर रचला मोठा रेकॉर्ड; शानदार कामगिरीने वेधले लक्ष

Voyager 1 One Light Day: विज्ञानाचे तंत्रज्ञान वापरतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारतो का?

IFFI Film Festival: भाषा, देश अन् संस्कृतीच्या सीमा ओलांडणारा सिनेमा; चला, जाऊ 'सीमाविरहित कथां'च्या जगात!

SCROLL FOR NEXT